बालकांची न्यूमोनियाची महागडी लस आता मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:36+5:302021-07-15T04:13:36+5:30
अमळनेर : शासनाने लहान मुलांसाठी असलेली महागड्या मोफत न्यूमोनिया लसीकरणास येथे सुरुवात केली असून, त्याचा प्रारंभ लोकनियुक्त ...

बालकांची न्यूमोनियाची महागडी लस आता मोफत
अमळनेर : शासनाने लहान मुलांसाठी असलेली महागड्या मोफत न्यूमोनिया लसीकरणास येथे सुरुवात केली असून, त्याचा प्रारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पहिल्याच टप्प्यात २१ बालकांना लस देण्यात आली. खासगी दवाखान्यात २ हजार ते २५०० रुपयांना मिळणारी लस आता शासनाने पालिका रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. वयाच्या दीड महिन्याला, साडेतीन महिन्याला आणि नवव्या महिन्याला बूस्टर डोस अशा तीन टप्प्यांत लसीकरण होणार आहे. खासगी दवाखान्यात ही लस घेणे पालकांना परवडत नव्हते. त्यामुळे बालकांना न्यूमोनिया होऊन आजाराची लागण होत होती आणि उपचारासाठीही पैसे लागत होते. पालिकेतर्फे आता मंगळवारी आणि शुक्रवारी नगरपालिका रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या बालकांना दीड महिन्यांनंतर लस दिली जाईल व इतर दिवशी विविध भागात जाऊन लस दिली जाईल. त्याचप्रमाणे मुलांना डायरिया होऊ नये म्हणून रोटा व्हायरलदेखील मोफत दिली जात आहे. खासगी दवाखान्यात ती परवडत नव्हती. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, आरोग्य सभापती घनश्याम पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, संजय चौधरी हजर होते.
बालकांच्या लसीकरणप्रसंगी नगरध्यक्षा पुष्पलता पाटील, आरोग्य सभापती श्याम पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर.
छाया - अंबिका फोटो