पोषण आहारात 'एक्स्पायरी'चा खडा!

By Admin | Updated: November 20, 2014 13:25 IST2014-11-20T13:25:23+5:302014-11-20T13:25:23+5:30

अजिंठा चौफुलीजवळील स्वस्तिक गोडावूनमध्ये शालेय पोषण आहारासाठी लागणार्‍या वस्तूंचा मुदतबाह्य साठा स्थानिक गुन्हा शाखेने उजेडात आणला.

The expanse of eczema in the nutrition diet! | पोषण आहारात 'एक्स्पायरी'चा खडा!

पोषण आहारात 'एक्स्पायरी'चा खडा!

जळगाव : अजिंठा चौफुलीजवळील स्वस्तिक गोडावूनमध्ये शालेय पोषण आहारासाठी लागणार्‍या वस्तूंचा मुदतबाह्य साठा स्थानिक गुन्हा शाखेने उजेडात आणला. तूर्त तरी गोडाऊनला सील ठोकण्यात आले आहे. मुद्देमाल किलोमध्ये मोहरी 28 584 मसाला हरभरा 66 मिरची 134 30

लीटर खाद्य तेल पोषण आहाराचे अधीक्षक सचिन मगर व एलसीबीने ही धाड टाकली. योगेश अशोक मंडोरे यांच्या गोडावूनमध्ये विनोद राठी (रा.पाचोरा) यांचा हा साठा आढळला. त्यांच्याकडे पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्याचा ठेका आहे. 
-------
तो मुद्देमाल बदलविण्यासाठीच आणला
अजिंठा चौफुलीवरच्या गोडाऊनवर धाड टाकल्यावर पोलिसांनी ठेकेदार विनोद राठी यांना घटनास्थळी बोलवित साहित्याबाबत विचारणा केली. राठी यांनी गोडावूनमधील साहित्य हे मुदतबाह्य असल्याने आपण ते बदलवून घेण्यासाठी जळगाव येथे आणल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील हे सध्या पुण्याला असल्याने ते जळगावात परत आल्यानंतर या साहित्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे पथकाने गोडावून सील केले आहे. या साहित्याबाबत एक अहवाल तयार करून तो पोलीस अधीक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांना सादर करण्यात येणार आहे. या अहवालानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
---------
गोडावून सील केले आहे. राठी ठेका दिला आहे. शिक्षणाधिकारी पुण्याहून परत आल्यानंतर चौकशी करून त्याबाबत पोलीस अधीक्षकांना एकत्रित अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.
-सचिन मगर, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जळगाव

Web Title: The expanse of eczema in the nutrition diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.