विदेशी पक्ष्यांनी गजबजले पाणवठे..

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:11+5:302015-12-05T09:07:11+5:30

जळगाव : स्थानिक पक्ष्यांसह विदेशी पक्ष्यांसाठी पुरक वातावरण असलेल्या जिल्ह्यातील पाणवठय़ांवर हिवाळ्य़ाची चाहूल लागताच विदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे.

Exotic birds get hot water .. | विदेशी पक्ष्यांनी गजबजले पाणवठे..

विदेशी पक्ष्यांनी गजबजले पाणवठे..

जळगाव : स्थानिक पक्ष्यांसह विदेशी पक्ष्यांसाठी पुरक वातावरण असलेल्या जिल्ह्यातील पाणवठय़ांवर हिवाळ्य़ाची चाहूल लागताच विदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. त्यामुळे विविध जाती आणि रंगबिरंगी पक्ष्यांच्या थव्यांनी पाणवठे गजबजली आहे. दरम्यान, यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे काही पक्ष्यांची संख्या घटल्याचे पक्षी मित्रांचे म्हणणे आहे.

दरवर्षी दिवाळी झाली की थंडी वाढू लागताच देशातील विविध भागात विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू होते. त्यातच जळगाव जिल्ह्यात पाणवठय़ातील जैव विविधता, दलदलीची जमीन आणि खाद्याची उपलब्धता यामुळे हा परिसर नेहमीच विदेशी पक्ष्यांसाठी चांगला अधिवास राहिलेला आहे.

विविध देशातील पक्ष्यांचे आगमन

यंदाही जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या तलाव, धरण परिसरात युरोप, सायबेरिया, तुर्कस्थान, हिमालय, तिबेट, मंगोलिया, लडाख यासह उत्तर भारतातील पक्षी तेथील असह्य थंडी सुसह्य करण्यासाठी तसेच अन्न मिळविण्याठी आणि प्रजननासाठी जिल्ह्यातील पाणवठय़ांवर मुक्कामाला आले आहेत. त्यांच्या आगमनाने पाणवठय़ावर चिवचिवाट वाढला आहे.

हिवाळी पक्षी निरीक्षण

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे हिवाळी पक्षी निरीक्षण करण्यात आले. यामध्ये मण्यारखेडा तलाव, मेहरुण तलाव, वाघूर धरण बॅकवॉटर, मनुदेवी साठवण तलाव, बहुळा प्रकल्प, मेहूण तसेच मुक्ताई मंदिर परिसर येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी विविध जातीचे पक्षी आढळून आले. पान वनस्पतींमध्ये भक्ष्य शोधणारी जांभळी पाणकोंबडी, युरोपातील ब्राrाणी बदक, नदीसूरय या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

Web Title: Exotic birds get hot water ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.