शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर पानमांजरीचे अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 12:19 IST

खान्देशात पहिलीच नोंद, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना आढळला प्राणी

विजयकुमार सैतवाल

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर जलाशय परिसरात पानमांजर हा संकटग्रस्त प्राणी असल्याचे सिद्ध झाले असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय ‘इला जर्नल’ या आंतराष्ट्रीय पुस्तिकानेही घेतली आहे. खान्देशात प्रथमच हा प्राणी आढळून आला असून जळगाव जिल्ह्याच्या जैवविविधता समृद्धतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे अभ्यासक वर्षभर जिल्ह्यातील विविध पानवठ्यांचे निरीक्षण करून वनस्पती, वन्यजीव आणि पक्षांची नोंद घेत असतात. याच नोंदीमध्ये आता ‘आॅटर’ अर्थात पानमांजर या संकटग्रस्त वन्यजीवांची भर पडली आहे.हतनूर धरणाच्या बॅक वॉटर भागात १८ जानेवारी २०१९ रोजी पक्षी निरीक्षण करीत असताना वन्य जीव संरक्षण संस्थेचे राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. त्या वेळी त्यांनी बारीक निरीक्षण केले असता सदर प्राणी पानमांजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या भागात वेळोवेळी भेट देत सदर प्राण्यांच्या नोंदी घेत त्याचे निरीक्षण करून अभ्यास केला. या दरम्यान त्याचे छायाचित्रेदेखील घेतले.

ही माहिती वन्यजीवांविषयी काढण्यात येणाऱ्या ‘इला जर्नल’ या आंतरराष्ट्रीय पुस्तकासाठी पाठविण्यात आली. यावर पूर्ण माहिती घेत ‘इला जर्नल’ने ही माहिती प्रसिद्धी केली. या पूर्वी संस्थेचे वनस्पती, पक्षी, सर्प यावर शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. यात पानमांजर या प्राण्याची नोंद महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रातदेखील सदर प्राण्यांची नोंद वनरक्षक रहीम तडवी यांनी घेतली आहे.

पहिलीच नोंद

जळगाव जिल्ह्यात तसेच खान्देशात या प्राण्याचे अस्तित्व आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी संस्थेच्या अभ्यासकांनी विविध गॅझेटचा अभ्यास केला. मात्र त्यात कोठेही पानमांजराची नोंद आढळली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ही पहिलीच ‘फोटोग्राफीक’ नोंद असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

सदर नोंदीसाठी उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. संस्थेचे रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, वासुदेव वाढे, सतीश कांबळे, योगेश गालफडे, गौरव शिंदे, सुरेंद्र नारखेडे, वनरक्षक रहीम तडवी, डोलारखेडा ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.

संकटग्रस्त प्राणी

जगात कोणते वन्यजीव संकटात आहे, याची नोंद घेत दरवर्षी माहिती प्रसिद्ध करणाºया ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेषन आॅफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेने त्यांच्या यादीमध्ये पानमांजराची नोंद संकटग्रस्त प्राणी म्हणून नोंद केली आहे. प्रदूषण, पाणथळ जागा नष्ट होणे, शिकार, अनियंत्रित मासेमारी, भक्षाची कमतरता याकारणांमुळे ही प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात आली आहे. अशा स्थितीत हा संकटग्रस्त पाणी जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वास वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना वन विभागाच्यावतीने नेहमी सहकार्य केले जाते. त्यांच्या अभ्यासादरम्यान अनेक प्राणी, वनस्पती आढळून आल्या असून त्याची नोंद वनविभागाकडे आहे. आता पानमांजर प्राण्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

- दिगंबर पगार, उप वनसंरक्षकवेळोवेळच्या निरीक्षण आणि अभ्यासावरून आता पानमांजराचे आपल्या भागात अधिवास आहे हे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारचे अनेक दुर्मिळ संकटग्रस्त प्राणी, पक्षी, जलचर, जिल्ह्यात अधिवास करून आहेत हे आपले भूषण असून हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल.

- राहुल सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था

 

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव