भुसावळ व बोदवडचे दोन गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:56 IST2017-07-19T15:56:50+5:302017-07-19T15:56:50+5:30

भुसावळ प्रातांधिका:यांनी दोन वर्षासाठी केले हद्दपार

Exile of two criminals of Bhusawal and Boduve | भुसावळ व बोदवडचे दोन गुन्हेगार हद्दपार

भुसावळ व बोदवडचे दोन गुन्हेगार हद्दपार

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.19 - गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या भुसावळ व बोदवड येथील प्रत्येकी एक अशा दोन जणांना भुसावळ उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी बुधवारी दोन वर्षासाठी हद्दपार केल्याचे आदेश जारी केले आहेत.
बोदवड येथील रहिवासी व अट्टल गुन्हेगार शाकीर उर्फ गण्या हाशम बागवान यास जळगाव व बुलढाणा असे दोन जिल्हे हद्दपार करण्यात आल्याचे आदेश  जारी केले. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी  याबाबत प्रस्ताव दिला आहे.
भुसावळातून एकाला हद्दपार
भुसावळ शहरातील खडकारोडवरील रहिवासी गोलू उर्फ शाकीर रशीद सैय्यद याला दोन वर्षासाठी जळगाव आणि धुळे जिल्हा बंदी करुन हद्दपारीचे आदेश जारी केले. लोहमार्ग पोलिसांनी गोलू याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता.
 

Web Title: Exile of two criminals of Bhusawal and Boduve