शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:32 PM2019-08-03T12:32:57+5:302019-08-03T12:33:23+5:30

ग्रामस्थांनी केले रस्ता रोको आंदोलन

Exclusion of students at school due to lack of access to school | शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार

Next

भुसावळ, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी येथील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शाळेवर बहिष्कार टाकला आहे. शुक्रवार, २ रोजी शाळेत जाताना रस्त्यातील चिखलामुळे काही विद्यार्थी पडले. त्यात एका चिमुकलीचा हात फ्रॅक्चर झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी ३ रोजी सकाळी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. डबर व मुरूम वाहतुकीच्या डंपर मुळे हा रस्ता खराब झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Exclusion of students at school due to lack of access to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव