पहिल्या टप्प्यातील विसजर्न उत्साहात

By Admin | Updated: September 22, 2015 00:32 IST2015-09-22T00:32:23+5:302015-09-22T00:32:23+5:30

253 मंडळांचा समावेश : नंदुरबारात उशिरार्पयत मिरवणुकांचा जल्लोष 253 मंडळांचा समावेश : नंदुरबारात उशिरार्पयत मिरवणुकांचा जल्लोष

Excitement of the first phase | पहिल्या टप्प्यातील विसजर्न उत्साहात

पहिल्या टप्प्यातील विसजर्न उत्साहात

नंदुरबार : बाप्पांचे आगमन होताच वरुणराजाचेही आगमन झाले होते. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण असताना पहिल्या टप्प्यातील बाप्पांना निरोप देताना भक्तांमध्ये तोच उत्साह आणि आनंद कायम दिसून आला. जिल्हाभरात अडीचशेपेक्षा अधिक मंडळांनी मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला. रात्री उशिरार्पयत नंदुरबार, व शहादा येथील काही मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. दरम्यान, नंदुरबारात 34 सार्वजनिक मंडळांतर्फे गणेश विसजर्न मिरवणुका काढण्यात आल्या. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

गणेशोत्सवाला गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरुवात झाली. बाप्पांच्या आगमनाबरोबर गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाचेदेखील आगमन झाले. सर्वत्र आनंद आणि उल्हासाचे वातावरण असतानाच पहिल्या टप्प्यातील बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली. त्यामुळे भक्तांमध्ये थोडी हुरहूर लागली तरीही बाप्पाने दुष्काळाचे संकट काहीअंशी दूर केल्याने उत्साह आणि आनंद द्विगुणीत राहिला. त्यामुळेच बाप्पांना निरोप देताना मंडळ कार्यकर्ते, सामान्य नागरिक यांच्यातील जल्लोष पाहाण्यासारखा होता. पहिल्या टप्प्यातील विसजर्न मिरवणुका सर्वत्र शांततेत आणि उत्साहात निघाल्या.

सकाळी 11 वाजेपासून काही मंडळांनी मिरवणुकांना सुरुवात केली. तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, मोलगी, सारंगखेडा, म्हसावद, विसरवाडी भागातील अनेक मंडळांच्या मिरवणुका आटोपल्या होत्या. तर नंदुरबार आणि शहादा शहरातील दहा ते बारा मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरार्पयत सुरू होत्या. सर्वत्र शांतता आणि उत्साहात मिरवणुका निघाल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नंदुरबारात मुख्य मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यात सरदार सोप फॅक्टरीसमोर, न्यू इंडिया स्टोअर्सजवळ, दीपक स्टोअर्ससमोर, सुपर कलेक्शनजवळ, मेघा साडी सेंटरचा बोळ, गोयल टेलर, गणपती मंदिरासमोरचा बोळ, सोनारखुंट, बालाजी वाडय़ाकडे जाणारा रस्ता, खिलापत चौक, त्रिमूर्ती ज्वेलर्स, एम.एम. ज्वेलर्स, शिरीषकुमार मेहता यांच्या घराजवळ, सी.एन. बोहरी यांच्या घराजवळ, सातपीर गल्ली, न्यू भारत रेस्टॉरंट, त्रिमूर्ती मेन्स पार्लर, शिवाजी चौक, दोशाह तकिया, वंदना मेडिकल, आंबेडकर चौकाकडे जाणारा रस्ता, भोई गल्लीकडे जाणारा रस्ता, सच्चिदानंद व्यायामशाळा, कुंभार गल्ली, सिद्धी विनायक मंदिर रोड व देसाईपुरा आणि रंग महालकडे जाणा:या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

वाहतूक वळवली

नंदुरबारातील वाहतूक विसजर्न मिरवणुकीच्या पाश्र्वभूमिवर सकाळपासून वळविण्यात आली होती. जड वाहनांना शहरात प्रवेश बंद होता. दुपारी 12 वाजेनंतर मंगळबाजार व सुभाष चौकातील बाजारही उठविण्यात आला होता. मुख्य मिरवणुकीचा मार्ग तोच असल्यामुळे विक्रेते स्वत:हून निघून गेले होते.

पालिकेतर्फे सोय

पालिकेतर्फे प्रकाशा येथे मूर्ती घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. मोठा मारुती मंदिराजवळ पालिकेची वाहने उभी करण्यात आली होती. काही मंडळे व खासगी स्वरूपातील मूर्ती वाहनात ठेवण्यात आल्या होत्या. निर्माल्यांचेदेखील संकलन करण्यात आले होते. काही मंडळांनी परस्पर प्रकाशा व कुकरमुंडा तापी पुलावरून मूर्ती विसजर्न केले.

Web Title: Excitement of the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.