बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:31+5:302020-12-05T04:24:31+5:30

विशाल सपकाळे यांचे यश जळगाव : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत विशाल सुरेश सपकाळे यांनी यश संपादन ...

Excitement on the death anniversary of Bahinabai Chaudhary | बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथी उत्साहात

बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथी उत्साहात

विशाल सपकाळे यांचे यश

जळगाव : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत विशाल सुरेश सपकाळे यांनी यश संपादन केले आहे. ते समाजकार्य या विषयातुन उत्तीर्ण झाले. ते सामाजिक कार्यकर्ते मनोज सपकाळे यांचे लहान बंधु होत.

महिला महाविद्यालयात अपंग दिन उत्साहात

जळगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अपंग दिनानिमित्त प्रा. गणपत धुमाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. धुमाळ यांनी अपंग बांधवांकडे पाण्याची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. संजय भामरे यांनी तर आभार प्रा. राजेश खर्डे यांनी मानले.

माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन

जळगाव : येथील राज प्राथमिक विद्यालयात व डॉ. सुनिल महाजन ज्युनिअर विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थांना ऑनलाईन मार्गदर्शन केेले.

पॉवर लिफ्टींग स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंची निवड

जळगाव : अमरावती येथे ५ व ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंतराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत जळगावातील शहिद भगतसिंग व्यायामशाळेच्या प्रकाश सपकाळे व दिपक खैरे या खेळाडूंची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सपकाळे व खैरे यांचे पॉवर लिफ्टींग असोसिएशनचे सचिव रमेश बनकर, प्रशिक्षक रुपेश पाटील आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Excitement on the death anniversary of Bahinabai Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.