चिनावल दूध उत्पादक सोसायटी सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:56+5:302021-09-24T04:18:56+5:30
यावेळी अजेंड्यावर असलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर बक्षीस ...

चिनावल दूध उत्पादक सोसायटी सभा उत्साहात
यावेळी अजेंड्यावर असलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेला यंदा झालेल्या नफ्यातून रिबिट तसेच १२ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यावेळी माजी सरपंच दामोधर महाजन, माजी चेअरमन अशोक नारखेडे, पोपट भारंबे यांच्यासह व्हा. चेअरमन विलास महाजन, संचालक कमलाकर पाटील, कैलास भंगाळे, चंद्रकांत पाटील , दिनकर भंगाळे , दिनकर गाजरे, अजय महाजन, सदानंद परमसागर, प्रमोद पाटील , सुरेश भालेराव , संदीप पाटील, उर्मिला झांबरे, वैशाली पाटील हे उपस्थित होते. अहवाल वाचन सेक्रेटरी सुधाकर बोंडे यांनी केले.