पाल आश्रमात बाबा रामदेवजी महाराज महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:51+5:302021-09-17T04:20:51+5:30

पाल, ता. रावेर : येथील वृंदावनधाम आश्रमात बाबा रामदेव महाराज जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. पाल आश्रमाचे ...

In the excitement of Baba Ramdevji Maharaj Festival at Pal Ashram | पाल आश्रमात बाबा रामदेवजी महाराज महोत्सव उत्साहात

पाल आश्रमात बाबा रामदेवजी महाराज महोत्सव उत्साहात

पाल, ता. रावेर : येथील वृंदावनधाम आश्रमात बाबा रामदेव महाराज जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली.

पाल आश्रमाचे गादीपती गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने अखंड नऊ दिवस बाबा रामदेव महाराज यांची कथा, सत्संग कार्यक्रम घेण्यात आले. गुरुवारी सकाळी महाराजांची आरती, पूजा होऊन महाप्रसाद अर्पण केले.

सकाळी प्रथम सत्रात गोपाल चैतन्य महाराजांनी बाबा रामदेव महाराज यांना प्रेमाने व भक्तीभावाने बाबेरी संबोधतात. जेथे प्रथम परमाणू बॉम्बचे विस्फोट केले गेले ती भूमी आज बाबा रामदेवराम पवित्र स्थान आहे. संपूर्ण भारतातील भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात. पाल आश्रमात झालेल्या या जयंती महोत्सवात भंडाऱ्याचे आयोजन संजय पवार यांनी केले.

यावेळी आमदार शिरीष चौधरी, युवा नेते धनंजय चौधरी, प्रादेशिक वनक्षेत्रपाल रावेर मुकेश महाजन, सातपुडा विकास मंडळाचे अजित पाटील, योगेश पाटील, अर्जुन जाधव, कामिल तडवी, युनूस तडवी, बबल तडवी, सत्तार अक्रम, हिरेखा कुरेशी, उत्तम पवार, उत्तम चव्हाण, नवीन पवार, दशरथ पवार, अनारसिंग चव्हाण, भीमसिंग राठोड, संतोष राठोड, छोटूलाल चव्हाण, कैलाश चव्हाण, राजेश महाजन, मिथून पवार, करणसिंह जाधव, पूनमचंद जाधव, दिलीप वारके, गौतम वारके, संजय चव्हाण, विकास चव्हाण, सुभाष चव्हाण, सुरेश चव्हाण, सुनील चव्हाण, जय पवार, धीरू पवार, प्रदीप जाधव, रमेश पवार, जितेन गवळी, परशुराम गवळी, आनदंराम गवळी, मयूर चव्हाण, अभेराम पवार, मगन पवार, नंदकिशोर चव्हाण, धनराज झिपा, धूमा पिथा, करणसिंह पवार, श्रावण पवार, थावरू पवार, नरेद्र चौधरी, ताहीर तडवी, भुरू तडवी, राजू तडवी, इम्रान शेख, मनोहर चव्हाण, दिलीप जाधव, उदेसिंग पवार आदी उपस्थित होते.

Web Title: In the excitement of Baba Ramdevji Maharaj Festival at Pal Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.