शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

कागदपत्रांच्या अदला बदलीने जिवंत महिलेला ठरविले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:52 IST

चुकीच्या संदर्भाने सर्वांनाच ताप

जळगाव : रुग्णसंख्या वाढणे व त्याचबरोबर नोंदणी, कागदपत्रे, अदलाबदली असे काहीसे प्रकार व यानंतरचा गोंधळ आता समोर येऊ लागला आहे़ भुसावळच्या मृतदेह अदलाबदली प्रकरणाला दिवस उलटत नाही तोच आणखी एक कागदपत्रांच्या अदलाबदलीचा प्रकार समोर आला़ पोलिसांनी नातेवाईकांना कळविण्यासाठी वडलीत फोन केला व महिला जिवंत असल्याचा उलगडा झाला़ ह्यलोकमतह्ण मुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला़इकरा वैद्यकीय महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे़ या ठिकाणी आॅक्सिजनची व्यवस्था असल्याने मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना दाखल करण्यात येत असते़ मात्र, रुग्णांची प्रकृती खाल्यावल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात संदर्भीत केले जाते़ रुग्णवाहिकेत रुग्णाला पाठविले जाते व त्यासोबत त्यांचा संदर्भ पत्र, रुग्णाची सर्व माहिती असणारे कागदपत्र दिली जातात़इकराच्या कोविड हेल्थ सेंटरमधून शनिवारी पहाटे एका महिलेची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्या महिलेला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले़ कोविड रुग्णालयात येईपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता़ रुग्णवाहिका चालकाने महिला व महिलेची कागदपत्रे सोपविली व परतला़ महिला मृत असल्याचे समजल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणीच नव्हते, अखेरह्यब्रॉड डेडह्ण म्हणून त्यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांना कळविले़ दरम्यान, कागदपत्र चुकल्याचा घोळ समोर आला तेव्हा कोविड रुग्णालयात मात्र, गोंधळ उडाला हा मृतदेह नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला. तासाभरानेनंतर हा घोळ मिटला अन् साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.लोकमत प्रतिनिधीला फोनकागदपत्रांवरून औद्योगिक वसाहत येथील हवालदार शिवदास चौधरी यांनी वडलीत नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो न झाल्याने त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधींना फोन करून महिलेच्या नातेवाईकांना कळवा व पाठवून द्या, असा निरोप दिला़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने तातडीने महिलेच्या नातेवाईकाला फोन लावला व मृत्यूचे सांगितले. मात्र, माझी आजी जिवंत आहे़ मी इकरा सेंटरलाच आहे़़़़़असे या मुलाने सांगितले व त्यानंतर जिवंत महिलेची कागदपत्र मृत महिलेसोबत गेल्याचा उलगडा झाला़ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कोविड रुग्णालयाला कळविले व त्यानंतर इकरा येथून परिचारिका आल्या व त्यांनी योग्य संदर्भ पत्र व कागदपत्रे दिली़ त्यानुसार संबधित मृत महिलेच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले.रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता़ पाऊसही होता़ यात नजरचुकीने झालेला हा प्रकार आहे़ कुणीही हेतुपुरस्कर केलेले नाही़-डॉ़ शांताराम ठाकूर, इकरा वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Jalgaonजळगाव