जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काउटर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:03 IST2019-09-08T23:03:07+5:302019-09-08T23:03:13+5:30

कळमसरे, ता.अमळनेर : जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काऊटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ ...

Excellent Scout Award for three teachers | जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काउटर पुरस्कार

जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काउटर पुरस्कार



कळमसरे, ता.अमळनेर : जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काऊटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे स्काऊट शिक्षक राजेंद्र इंदास सुर्यवंशी, सरदार एस.के.पवार विद्यालय नगरदेवळाचे गणेश पवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्काऊटर तर पी.एम.मुंदडा विद्यालय पिंप्राळाच्या रत्ना बागूल यांना राज्यस्तरीय गाईडर पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आला.
राज्य स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे अध्यक्षस्थानी होते.

Web Title: Excellent Scout Award for three teachers