शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

५ जानेवारीपासून होणा-या परीक्षा ‘ऑनलाईन’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 7:54 PM

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची डिसेंबर आणि जानेवारी मधील परीक्षा कोविड-१९ चा प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीकक्यू) स्वरुपात ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.विद्यापीठाने ५ नोव्हेंबरच्या पत्रान्वये वरील परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याबाबत महाविद्यालयांना कळविले होते. तसेच २८ डिसेंबर पासून काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार, फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे भुषण भदाणे यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी निशांत शिपी, दीपक सोनवणे, प्रवीण खिरोळकर, दीपक शिरसाठ, शुभम तायडे यांनी सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात यावी, अशी मागणी कुलगुरूंकडे केली होती. अखेर आता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.मॉक टेस्ट द्यावी लागणारविद्यार्थ्यांना सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावाकरीता सराव चाचणी अर्थात मॉक टेस्ट आयोजन करणे आवश्यक आहे. याकरीता २८ डिसेंबर पासून होणाऱ्या परीक्षा ५ जानेवारी पासून सुरु होतील. सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन केंद्राचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव