वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या आजपासून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:12+5:302021-06-10T04:13:12+5:30

जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र ...

Examination of medical course from today | वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या आजपासून परीक्षा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या आजपासून परीक्षा

जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षेचे केंद्र असून, १० ते २३ जून दरम्यान दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यात एमबीबीएस पहिल्या वर्षाला ५१ आणि दुसऱ्या वर्षाला ९९ विद्यार्थी आहेत. त्याबाबत बुधवारी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत केंद्रीय निरीक्षक डॉ.एस.एस. मडावी, केंद्र प्रमुख डॉ. अरुण कसोटे, अंतर्गत भरारी पथक प्रमुख डॉ. भारत घोडके उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षांबाबत माहिती देण्यात आली. जळगावच्या महाविद्यालयात चार कक्षांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

कार्यशाळेत परीक्षा प्रणाली कशी होईल, याची माहिती निरीक्षकांनी दिली. कक्षात कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळूनच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल पाहूनच प्रवेश दिला जाईल.

परीक्षा सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि भरारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

यावेळी वरिष्ठ परिवेक्षक डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. गिरीश राणे, डॉ. गणेश लोखंडे, प्रदीप जैस्वाल, किरण बावस्कर, विशाल दळवी आदी उपस्थित होते.

Web Title: Examination of medical course from today