माजी राष्टÑपती कलाम आज जळगावात

By Admin | Updated: May 21, 2014 01:15 IST2014-05-21T01:15:19+5:302014-05-21T01:15:19+5:30

उमविचा पदवीप्रदान सोहळा : भरगच्च कार्यक्रम

Ex-nation- Patiala Kalam today in Jalgaon | माजी राष्टÑपती कलाम आज जळगावात

माजी राष्टÑपती कलाम आज जळगावात

 जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या २२व्या पदवीप्रदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्टÑपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम २१ रोजी जळगावात येत आहेत. सकाळी ११.४५ वाजता ते दिल्लीहून मुंबई विमानतळावर येतील. त्यानंतर मुंबई विमानतळावरून कलाम दुपारी १२ वाजता जळगावला येण्यासाठी निघतील. दुपारी १.१५ वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. दुपारी १.४५ वाजता ते विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाउसला येतील. त्यानंतर लगेचच दुपारी २ वाजता त्यांच्या हस्ते विद्यार्थी भवनच्या कोनशिलेचे अनावरण होईल. दुपारी २.४५ वाजता ते दीक्षांत सभागृहात येतील. याप्रसंगी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी ते २५ मिनिटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी ४.३० वाजता ते जैन इरिगेशनच्या टिश्यू कल्चर पार्क ला भेट देणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता ते गांधीतीर्थकडे जाण्यासाठी निघणार असून याठिकाणी ते शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी ७.४५ वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईकडे जाणार आहेत.

Web Title: Ex-nation- Patiala Kalam today in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.