शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

माजी नगरसेवक अरूण शिरसाळे यांच्या सोशल क्लबवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 10:05 IST

४४ जणांना अटक

ठळक मुद्दे: ४३ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जळगाव : सोशल क्लबच्या नावाखाली बी.जे.मार्केटसमोरील बाबा प्लाझामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली, त्यात व्यवस्थापकासह ४४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४२ हजार ९८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. हा क्लब माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांच्या मालकीचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बी.जे.मार्केटसमोरील बाबा प्लाझामध्ये सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांनी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सायंकाळी साडे चार वाजता पथकाने बाबा प्लाझामध्ये धाड टाकली. सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत कारवाई सुरुच होती. पंचनामा करुन जुगाºयांना साहित्यासह जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तेथे गुन्हा दाखल करण्यात आला.यांना केली अटकविलास संतोष पाटील (रा. सदोबा नगर), संतोष दगडू महाजन ( रा. रामेश्वर कॉलनी), चेतन सोनू बारी ( रा .नेहरु नगर), संदीप सुभाष चौधरी (रा.मोहन नगर), अर्जुन गजानन सोनार ( रा.संभाजी नगर), ईश्वर लोटन पाटील (एलआयसी कॉलनी), श्रीकृष्ण गंगाधर लोहार (, रा.तुळसाईनगर), विकास देविदास बागळे ( रा.वाघ नगर), मयुर श्रीकृष्ण लोहार (रा.तुळसाईनगर), विठ्ठल कृष्णा पाटील (, मारोती पेठ), कैलास ओंकार कोडवणे (रा.खेडी), दिलीप नंदकिशोर जोशी (रा.भोईटे नगर), अब्दुल शहा गबदुलशहा रहेमान ( रा.शनी पेठ), दिलीप माणिकचंद शर्मा (रा.नशिराबाद), योगेश वसंत पाटील ( रा.गेंदालाल मील), आबीद खान शब्बीर खान (रा.तांबापुरा), शकील शेख रशिद कुरेशी ( रा.मास्टर कॉलनी), मो.कलीम मो.अकबर (रा.बळीराम पेठ), नागेश प्रभाकर दुबे ( रा.शंकरराव नगर), दिनेश प्रभाकर मेढे ( रा.सुप्रीम कॉलनी), निलेश विजय तंबाखे (रा.सदगुरु नगर), किरण गणेश सानेवणे (वय ३७, रा.कांचननगर), बापु रघुनाथ सूर्यवंशी (वय ४०, रा.गेंदालाल मील), पवनकुमार रत्नाकर ठाकूर (वय ३२, रा.पोलन पेठ), यशवंत लिलाधर माळी (वय ४५, रा.,साकळी, ता. यावल),अशपाक अब्दुल गफूर ( रा.भवानी पेठ), दिलीप बुधो महाजन (, रा.नशिराबाद), सुरेश मगनलाल शर्मा (वय ५४, रा.रणछोड नगर), प्रशांत मुकुंदा विसपुते (वय ३८, रा.रथ चौक), विनोद गोकुळदास कासट (वय ६०, रा.यशवंत कॉलनी), भागवत शामराव सोनवणे (वय ५५, रा.पिंप्राळा), संतोष तुकाराम गिरमकर (वय४०, रा.रामेश्वर कॉलनी), किरण कालिदास जोशी (वय ६७, रा.मोहन नगर), शेख दस्तगीर शेख जहांगीर (वय ४२, रा.मास्टर कॉलनी), शेख जाकीर शेख दगडू (वय ३२, रा.गेंदालाल मील),राकेश धनराज हटकर (वय २०,रा.तांबापुरा), शेख रफिक शेख रशीद (वय ५८, रा.उस्मानिया पार्क), पुरुषोत्तम दत्तात्रय बाविस्कर (वय ६९, रा.शनी पेठ), महम्मद याकूब महम्मद शरीफ (रा.खडकीचाळ), अनिस रसुल पिंजारी (, रा.शनी पेठ), राजेंद्र रामदास झोपे (रा. विठ्ठल पेठ), अजितसिंग पुरण प्रतापसिंग परीहार, सुभाष खुशाल खडके (वय ६४, रा.विठ्ठल पेठ) व देविदास यादव मगर (वय ५८, रा.रामेश्वर कॉलनी) आदी.अरुण शिरसाळे संस्थेचे अध्यक्षकै.केशवराव शिरसाळे क्रिडा मंडळ या नावाने संस्थेची नोंदणी असून माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे अध्यक्ष तर सचिव आसीफखान अब्दुलखान (वय ५४, रा.बालाजी पेठ) व बलराज प्रभुदयाल तनेजा (वय ४५, रा.न्यू.बी.जे.मार्केट, जळगाव) हा व्यवस्थापक आहे. सचिव व व्यवस्थापक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्रिडा संस्थेच्या नियमावलीनुसार उपनियमांची पुस्तिका, सभासदांची यादी, खेळ खेळण्यासाठी आलेल्या सभासदांची नोंद वही, मनोरंजनासाठी भरलेल्या शुल्काची नोंदवही यापैकी कोणतेच रेकॉर्ड क्लबवर आढळून आले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी