EVM breaks in Pathar, half hour voting jam | पथराड येथे ईव्हीएममध्ये बिघाड, अर्धा तास मतदान ठप्प

पथराड येथे ईव्हीएममध्ये बिघाड, अर्धा तास मतदान ठप्पपथराड, ता. धरणगाव : पथराड येथे सकाळी बुथ क्र. १८० या ठिकाणी ईव्हीएम मशीन ८ वाजून १० मिनटाने बंद पडले. या वेळी बुथ निवडणूक अधिकारी यांनी झोनल अधिकारी यांना मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे सांगितले व काही मिनिटांत अधिकारी बूथवर दाखल झाले. मतदान यंत्र सेट पूर्ण बदलण्यात आले. त्या नंतर पुन्हा मतदान ८ वाजून ४९ मिनिटांनी सुरू करण्यात आले. या वेळी निवडणूक अधिकारी वर्ग यांची धांदल उडाली.

Web Title: EVM breaks in Pathar, half hour voting jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.