'व्हॉट्स अँप'वर ईल मजकूर, दोघांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: October 8, 2014 11:46 IST2014-10-08T11:46:57+5:302014-10-08T11:46:57+5:30

'व्हॉट्स अँप'वर ईल मजकूर टाकून एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Evil text on 'What's ape', crime against both | 'व्हॉट्स अँप'वर ईल मजकूर, दोघांविरुद्ध गुन्हा

'व्हॉट्स अँप'वर ईल मजकूर, दोघांविरुद्ध गुन्हा

>धुळे : 'व्हॉट्स अँप'वर ईल मजकूर टाकून एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कडक कारवाईची मागणी केली जात आहे. 
गुन्डे रिटर्न या व्हॉट्स अँप ग्रुपवरून दोन तरुणांनी आपल्या मोबाइल क्रमांकावर ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एका समाजाविरुद्ध ईल मेसेज पाठवून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. 
यासंदर्भात मिल्लतनगरातील व्यापारी शकील अहमद जमील अहमद शेख यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश आर. गवळी (वय २७ रा. पद्मनाभनगर, साक्री रोड, धुळे) व भारत लक्ष्मण समशेर (वय २४, रा. रासकरनगर, चितोड रोड, धुळे) यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९५ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २000 चे कलम ६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक एन. जी. गवळे करीत आहेत. याप्रकरणी कुणालाही अटक नव्हती. दरम्यान, हे प्रकार वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व तेढ निर्माण करणार्‍यांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Evil text on 'What's ape', crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.