राष्ट्रीय रजिस्टर ठेवेल प्रत्येकाची माहिती
By Admin | Updated: October 10, 2015 01:00 IST2015-10-10T01:00:09+5:302015-10-10T01:00:09+5:30
नंदूरबार : जनगणनेची आकडेवारी धर्मनिहाय जाहीर झाल्यानंतर आता शासनाने राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करण्याचे पाऊल उचलले आहे

राष्ट्रीय रजिस्टर ठेवेल प्रत्येकाची माहिती
नंदूरबार : च्या आनुषंगाने राहणार आहे. जिल्ह्यात या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एकीकडे दर 10 वर्षानी जनगणना होते. त्या वेळी प्रत्येक नागरिकाचा डेटाबेस घेतला जातो. त्याचे अद्ययावतीकरण मात्र लोकसंख्येच्या आकडेवारीत राहून जाते. परिणामी 10 वर्षात प्रत्येक नागरिकाच्या माहितीचे संकलन अद्ययावत राहणे आवश्यक असते. त्याला जर असे असेल नियोजन प्रगणकाला जनगणनेच्या कामाप्रमाणेच हे काम करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना आधीच संबंधित गणना गटाची संक्षिप्त घर यादी, मांडणीदर्शक नकाशा आणि राष्ट्रीय रजिस्टर पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला भेट देताना शक्यतो कुटुंबप्रमुखाकडूनच माहिती संकलित करणे सक्तीचे करण्यात आले आहे. पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे, आईचे नाव, सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता याची नोंद करून आधार क्रमांकाची नोंद घेतली जाणार आहे. शिवाय प्रत्येकाचा मोबाइल नंबरही नोंद केला जाणार आहे. माहिती भरून घेतल्यानंतर कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जाऊन बाजूलाच प्रगणकाची सही राहणार आहे. प्रत्येक व्यक्तीचे नाव आधार कार्डावरील नावाशी पडताळून पाहिले जाणार आहे. नाव जुळत नसेल तर आधार कार्डावर जे नाव असेल तेच नाव या रजिस्टरमध्ये लिहिले जाणार आहे. तीच बाब जन्मतारीख, लिंग, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि पत्ता याच्याशीदेखील जुळवली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेत आधार कार्डला महत्त्व आहे. आधार कार्डावरील माहितीच प्रामुख्याने राष्ट्रीय रजिस्टरमध्ये नोंदलेली राहणार आहे. याशिवाय रेशन कार्डचा क्रमांकही नोंदला जाणार आहेच. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमधून आता मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. अशा वेळी किती कुटुंबे सापडतील, किती कुटुंबप्रमुखांकडून माहिती संकलित केली जाईल हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत प्रगणकांकडून काम करून घेणे म्हणजे मोठे दिव्यच आहे. परिणामी या कामाला शासनाला मुदतवाढ द्यावी लागणार असे स्थानिक स्तरावरचे चित्र आहे. केवळ 70 टक्केच 4