तक्रार करणे प्रत्येकाचा हक्कच : स्मिता वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:26+5:302021-03-04T04:29:26+5:30
रहिवासी म्हणतात, दोन वर्षांपासून त्रास वाढला या घटनेबाबत ‘लोकमत’ने वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली असता, देवेंद्र मोरदे यांनी ...

तक्रार करणे प्रत्येकाचा हक्कच : स्मिता वाघ
रहिवासी म्हणतात, दोन वर्षांपासून त्रास वाढला
या घटनेबाबत ‘लोकमत’ने वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली असता, देवेंद्र मोरदे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून संस्थेत खूप वाईट प्रकार होत आहे. रोज केव्हाही मुले येतात. मुलींना इशारे करतात, आतमध्ये जायला परवानगी नाही, पण ते बाहेरुन मुलींशी बोलतात. विशेष म्हणजे संस्थेच्या कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार होतो, पण त्यांच्याकडून प्रतिकार किंवा विरोध केला जात नाही. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नसल्याचे स्पष्ट मत मोरदे यांनी व्यक्त केले.
वातावरण अतिशय गलिच्छ; संस्था हलवा
शेजारी राहणाऱ्या एका वृध्द महिलेने संस्थेविषयी अत्यंत वाईट प्रतिक्रिया नोंदविली. इथलं वातावरण अतिशय गलिच्छ आहे, महिला असल्याने जास्त बोलू शकत नाही, पण आमच्या कॉलनीतून हे वसतिगृह इतर ठिकाणी हलवावे. आमच्या घरात मुली व महिला आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होतोय, असेही गल्लीतील महिला म्हणाल्या. दुसऱ्या एका महिलेने येथील संस्थेत चुकीचा प्रकार कधीच घडलेला नाही. बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले.
पोलीस आणि समितीने नोंदविले जबाब
जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे यांनीही सकाळी वसतिगृहाला भेट दिली. नेमका प्रकार काय झाला, याची चौकशी करून काही जणांचे जबाब नोंदविले. दोन तास थांबल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोंधळाबाबत पोलिसांनी समोरील घरांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची समिती चौकशी करीत होती.
गोंधळ घालणाऱ्यांविरुध्दही तक्रार
मंगळवारी दुपारी संस्थेत येऊन गोंधळ घालणाऱ्या पुरुष व महिलांविरुध्द संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. यातील काही जणांनी अरेरावी व शिवीगाळ केली तसेच गेटवरून उडी घेऊन आतमध्ये येण्याचा प्रकार केला होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गल्लीतील काही लोकांनी देखील त्यास दुजोरा दिला.