शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर बंदी घातली असून, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर बंदी घातली असून, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या सुचनाही स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. असे असतानांही शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत नागरिक बिनधास्त धुम्रपान करतांना आढळून आले. स्थानिक प्रशासन व अन्न व औषध प्रशासनातर्फे धुम्रपान करणाऱ्यांवर तसेच गुटखा-तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून आ‌ले. शासनाने धुम्रपान करणाऱ्यांवर २०० रूपये दंडाची कारवाई फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

`लोकमत` प्रतिनिधीने शनिवारी शहरातील नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नुतन मराठा महाविद्यालय, टॉवर चौक, नेहरू चौक, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान आदी सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी नागरिक अगदी बिनधास्तपणे बिडी, सिगारेट ओढतांना दिसून आले. विशेष म्हणजे गुटखा खाल्यानंतर बाजूलाच असलेल्या भिंती रंगवितांना दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धुम्रपान करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्या अशा नागरिकांवर मनपा व अन्न व औषध प्रशासनाला २०० रूपये दंडाची कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील एका पानटपरी चालकाने सांगितली की, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई होतांना दिसून आली नसल्याचे सांगितले. तर काही नागरिकांनी २०० दंडाची खरोखर कारवाई होते का? याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

इन्फो :

प्रशासनाकडून कारवाईचा फक्त कांगावा

शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे धुम्रपान करित असून, याच ठिकाणी लपून-छपून दुकानांमध्ये गुटखा विक्री सुरू आहे. असे असतांना अन्न व औषध प्रशासनातर्फे धुम्रपान करणाऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसून, फक्त कारवाई सुरूच असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली नाही.

इन्फो :

तर सर्वांना दंडाचे अधिकार प्राप्त

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाला अधिकार असून, हे अधिकारी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनालाही अधिकार असल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले. याबाबत मनपा आरोग्य विभागाकडे माहिती मागितली असता, त्यांनी याबाबत कारवाई होत असल्याचे सांगितले. मात्र, आता पर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आल्या, या बाबत सध्या माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

इ्न्फो :

बिडी आणि सिगारेट ओढण्याचे धोके मोठ्या प्रमाणात आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असताे. तसेच शरिराची रोगप्रतिकारक शक्तीही धुम्रपानामुळे कमी होते. शरीरासाठी धुम्रपान हे धोक्याचेच असल्याचे शहरातील डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले.