बेड मॅनेजमेंटबाबत रोज होतेय ५० लोकांकडून विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:41+5:302021-03-27T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर रुम स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी बेड ...

बेड मॅनेजमेंटबाबत रोज होतेय ५० लोकांकडून विचारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर रुम स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी बेड मॅेनेजमेंट, रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी तसेच मृत्यू परीक्षण आदी कामांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्या ॲक्शनमोडवर आहेत. यात माहिती घेतली असता दिवसाला बेड उपलब्धतेबाबतच सर्वाधिक विचारणा होत असल्याचे सांगण्यात आले. दिवसातून किमान ५० फोन या विचारणे बाबतचे असतात.
जीएमसीच्या कक्षांमध्ये काही तक्रारी असल्यास त्या सोडविण्यासाठीही एक समिती आहे. यात दिवसभरातून चार ते पाच तक्रारी प्राप्त होत असतात, यात कक्षात पानी नाही., रुग्णाची तब्येत कशी आहे. आदींची विचारणा होत असते. यात तक्रार आल्यानंतर तातडीने संबधित कक्षाच्या प्रमुखाशी चर्चा केल्यानंतर तक्रार सोडविली जाते व नंतर नातेवाईकाला याची माहितीही दिली जाते. असे वॉररूमचे काम सध्या स्थितीत सुरू आहे.
बेड फुल
जीएमसीतील सर्व ३६८ बेड फूल आहेत. अशा स्थितीत बेड मॅनेजमेंटसाठी असलेली समितीही हतबलता दर्शवित असते. गुरूवारीच सर्व कक्ष उघडण्यात आले होते. तातडीने हे सर्व कक्ष फुल झाले आहेत. रुग्णांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टर सांगतात.