अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 11, 2015 01:08 IST2015-10-11T01:08:21+5:302015-10-11T01:08:21+5:30

जळगाव : दोन बायकांमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक पोलिसावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Eventually, the police filed a rape case against the transport policemen | अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव : दोन बायकांमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक शाखेतील हवालदार नानासाहेब सदू पाटील (56, रा.पोलीस क्वार्टर) यांच्यावर शनिवारी संध्याकाळी शहर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन बायकांचा हा वाद आपसात मिटावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका:यांनीही  प्रय} केले, परंतु त्यात सर्वाना अपयश आले.
गुरुवारी पीडित महिला, नानासाहेब पाटील व त्यांची प}ी असे तिघेजण पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. दुपारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या दालनाच्या बाहेर दुस:या प}ीने पाटील यांना मारहाण केली होती. संध्याकाळी पीडित महिलेने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेतली होती. अखेरचा प्रय} म्हणून सुपेकर यांनी पाटील, त्यांची प}ी व दुसरी प}ी अशा तिघांना बोलावले होते. त्यानुसार तिघांनी शनिवारी डॉ.सुपेकर यांची भेट घेतली. मात्र या भेटीतही काहीच फलीत न निघाल्याने शेवटी पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.

2001 पासून अत्याचार
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नानासाहेब पाटील 2001 ते 2015 या पंधरा वर्षात जळगाव येथे घरी व लॉजवर तसेच वनी (चंद्रपूर), अकोला, माहुरगड (यवतमाळ), भुसावळ, नशिराबाद, मंगरुळपीर, एरंडोल व शेगाव येथे वेळोवेळी लगAाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे म्हटले आहे. माङया पतीला धमकी देऊन पाटील यांनी त्यांना गाव सोडायला लावले.  तू माझी दुसरी प}ी आहे, मी तुङो पालन पोषण करेल असे सांगून पंधरा वर्ष प}ी म्हणून वागविले. जळगाव, शेगाव येथे भाडय़ाने घर घेऊन मुलांसह राहण्याची व्यवस्था करून दिली. परंतु नंतर लगAही केले नाही व कोणताच खर्च केला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Eventually, the police filed a rape case against the transport policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.