अखेर ‘त्या’ दुचाकीस्वाराची प्राणज्योत मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:21+5:302020-12-04T04:42:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लग्न आटोपून घरी निघालेले यशवंत मोतीलाल पाटील (३७, रा़ शिरसोली) यांना अज्ञात वाहनाने धडक ...

अखेर ‘त्या’ दुचाकीस्वाराची प्राणज्योत मालवली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्न आटोपून घरी निघालेले यशवंत मोतीलाल पाटील (३७, रा़ शिरसोली) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती़ यात ते गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसापासून त्यांच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ अखेर बुधवारी उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
यशवंत पाटील हे शिरसोली येथे कुटूंबियांसोबत वास्तव्यास होते. ते जैेन कंपनी कामाला होता. सोमवारी नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे ते जळगाव शहरात आले होते. सायंकाळी लग्न आटोपून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉनच्या काही अंतरावर त्यांना भरधाव चारचाकीने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार नातेवाईकांना कळताच, त्यांनी त्याठिकाणी धाव घेवून पाटील यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. दरम्यान, बुधवारी उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मोठा भाऊ असा परिवार आहे.