नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:54+5:302021-09-02T04:35:54+5:30

नाथ मंदिर (विठ्ठल मंदिर) संस्थानच्या ट्रस्टींची सभा संस्था अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात ...

Events on the occasion of Narayan Maharaj Punyatithi celebrations canceled | नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द

नारायण महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द

नाथ मंदिर (विठ्ठल मंदिर) संस्थानच्या ट्रस्टींची सभा संस्था अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात नारायणनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीवर अभिषेक व पूजा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात येईल. महाप्रसाद, मिरवणूक हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे सभेत ठरले. सभेला सदस्य रामा पाचपांडे, तोताराम फिरके, शरद महाजन, नीळकंठ रा.फिरके, प्रल्हाद बोरोले, अविनाश फिरके, गोपाळ वारके, यशवंत बोरोले, हर्षद महाजन, प्रमोद ठोंबरे, वासुदेव तळेले, प्रमोद इंगळे, गीतेश्वर भंगाळे, गोपाळ वारके, कृष्णा वारके, किशोर इंगळे, भास्कर पाटील, पोलीसपाटील संजय चौधरी, प्रा. देवेंद्र पाचपांडे, हर्षद महाजन, प्रेमचंद तळेले, तुळशीराम फेगडे, बाळू इंगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन सेक्रेटरी विलास भोगे यांनी केले. आभार तुळशीदास चोपडे यांनी मानले.

Web Title: Events on the occasion of Narayan Maharaj Punyatithi celebrations canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.