शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लग्नाची मेहंदी पुसण्यापूर्वीच नव विवाहीत तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:11 IST

एक तरूण गंभीर जखमी

जळगाव : लग्न आटोपून घरी परतणाऱ्या तरूणांच्या दुकचाीला भरधाव बँन्डच्या वाहनाने समोरून धडक दिली़ या अपघातामध्ये महेंद्र शिवाजी पाटील (वय-२९, रा़ कुसंूंबा) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर सागर प्रकाश पाटील (वय-२४) हा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९़३० वाजता शिरसोली रस्त्यावरील श्रीकृृष्ण लॉन्ससमोर घडली़ दरम्यान, महेंद्र याचा आठ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता़तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील यांच्या मुलीचा मंगळवारी सायंकाळी विवाह होता़ त्यामुळे महेंद्र आणि त्याचा मित्र सागर हे दोघे एमएच़१९़एके़ २६८१ क्रमांकाच्या मोटारसायकलीने लग्नाला गेले होते. सायंकाळी लग्न सोहळा आटोपून दोघेही घरच्या मार्गाला निघाले़ शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण लॉन्सजवळ समोरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाºया भरधाव बँन्डच्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र याच्या डोक्याला आणि चेहºयाला जबर मार बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर सागर हा गंभीर जखमी झाला.नागरिकांची घटनास्थळी धावदोन्ही वाहनांच्या अपघाताचा मोठा आवाज झाल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना दोन तरूण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले़ नंतर काहींनी एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी सचिन देशमुख, सिध्दार्थ लटपटे यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले़ अखेर पोलिसांनी मयताच्या व जखमीच्या जवळ मिळून आलेल्या मोबाईलवरून त्यांची ओळख पटण्यास मदत झाली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने रिक्षातून मृतदेह व जखमी रूग्णालयात नेण्यात आले़ जखमी सागर याला खाजगी रूग्णालयात नेण्यात आले़अपघातानंतर बँन्डचे वाहन फरारदुचाकीला धडक दिल्यानंतर बँन्डचे वाहन हे पसार झाले़ नागरिकांनी वाहनास पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र ते वाहन शिरसोलीच्या दिशेने पसार झाल्याचे नागरिकांनी सांगितले़ तसेच संतकृपा बँन्ड नावाचे ते वाहन असल्याचेही नागरिकांनी सांगितले़ रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करीत हळहळ व्यक्त केली़आठ दिवसांपूर्वीच झाला होता विवाहमहेंद्र हा कुसुंबा गावात दुधाचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच त्याच्या कुटुंबियांनी रुग्णलयात धाव घेवून आक्रोश करीत हंबरडा फोडला़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहीणी असा परिवार आहे. तर जखमी सागर हा चटईच्या कंपनीत कामाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह वावडदा येथील मित्रमंडळींची देखील प्रंचड गर्दी झालेली होती़

टॅग्स :Jalgaonजळगाव