प्रवासाचा प्लॅन बदलला तरीही तिकीट रद्द न करता आता प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:55+5:302021-09-03T04:16:55+5:30

भुसावळ : आता रेल्वे प्रवासाचा प्लॅन बदलला तर प्रवासाची तारीख आणि वेळही रेल्वेच्या उपलब्धतेनुसार आणि प्रवाशांच्या सुविधेनुसार बदलण्याची ...

Even if the travel plan is changed, it is now possible to travel without canceling the ticket | प्रवासाचा प्लॅन बदलला तरीही तिकीट रद्द न करता आता प्रवास शक्य

प्रवासाचा प्लॅन बदलला तरीही तिकीट रद्द न करता आता प्रवास शक्य

भुसावळ : आता रेल्वे प्रवासाचा प्लॅन बदलला तर प्रवासाची तारीख आणि वेळही रेल्वेच्या उपलब्धतेनुसार आणि प्रवाशांच्या सुविधेनुसार बदलण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे आता प्रवासाची तारीख ही आरक्षण झालेले तिकीट रद्द न करता बदलण्याची सोय झाली आहे.

अनेकदा काही कारणामुळे आरक्षण करूनही निश्चित झालेल्या प्रवासाच्या तारखेत बदल करावा लागतो. यामुळे बऱ्याचदा प्रवासी बूक केलेले रेल्वेचे तिकीट रद्द करून दुसरे तिकीट काढतात. यामध्ये पैसेही कापले जातात. परंतु, रेल्वेच्या नियमानुसार आणि सुविधेनुसार, पहिले तिकीट रद्द न करता प्रवाशांना दुसरे तिकीट बूक करता येऊ शकते.

बोर्डिंग स्टेशनमध्ये करता येईल बदल

मूळ बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला लिखित स्वरूपात अर्ज देऊन रेल्वे सुटण्यापूर्वी कमीतकमी २४ तास अगोदर कोणत्याही कॉम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर जाऊन प्रवासी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करू शकतात. ही सुविधा ऑफलाइन तर उपलब्ध आहेच; परंतु ऑनलाइन बुकिंगमध्येही हा पर्याय उपलब्ध आहे.

याचबरोबर प्रवास आणखी वाढवायचा असेल, अर्थात ज्या स्टेशनपर्यंत बुकिंग केलेले आहे व त्याच्या पुढच्या काही स्टेशनपर्यंत जायचे असेल तरीसुद्धा रेल्वेकडून ही सुविधा मिळते. यासाठी प्रवाशांना बूक केलेला प्रवास पूर्ण होण्याअगोदर तिकीट चेंकिंग स्टाफशी संपर्क साधावा लागेल.

एकाच वेळेस करता येणार बदल

रेल्वे स्टेशन काउंटरवर बूक करण्यात आलेल्या तिकिटाच्या तारखेत जास्तीतजास्त एक वेळा बदल करता येऊ शकतो. मग जागेची उपलब्धता, कन्फर्म असो किंवा आरएसी किंवा वेटिंग असो... प्रवाशांना ही सुविधा केवळ ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाइन बूक करण्यात आलेल्या तिकिटांवर ही सुविधा उपलब्ध नाही.

Web Title: Even if the travel plan is changed, it is now possible to travel without canceling the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.