शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

अर्ध्यावरती डाव मोडला जरी पूर्ण केली कहाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:37 IST

मी नवदुर्गा- सरलाबाई चौधरी

नाव : सरलाबाई मोतीलाल चौधरीव्यवसाय : चाळीसगाव पोस्ट कार्यालयात मेल वितरकनोंद घेण्यासारखे कार्य :पती निधनानंतर नोकरी स्वीकारलीपाच मुलींचे विवाह केले एकटीनेबसस्थानकात दरदिवशी सात तास थांबून टपाल पिशव्यांची करतात पोहचआजारावर माती करीत ओढला संसाराचा गाडाअल्प शिक्षित असूनही मुलींना शिकवलेचाळीसगाव बसस्थानकावर दरदिवशी 'तिची' लगबग सुरुच असते. बसमध्ये टपाल पिशव्यांची पोहच करण्याचे काम ती करते. दुपारी एकपर्यंत तिची धावपळ सुरुच असते. तिच्या याच धावपळीने संसाराला आधार मिळाला. पतीच्या निधनानंतर अर्ध्यावरती मोडलेला डाव तिने जिद्दीने पुढे रेटला. कष्टक-यांमधील नवदुर्गा म्हणून सरलाबाई मोतीलाल चौधरी वेगळ्या ठरतात. गेल्या १४ वर्षापासून त्या एकाकी परिस्थितीशी सामना करीत आहे. पतीच्या निधनाचा घाव पचवून त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसत पदर खोचला. पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण करीत हातही पिवळे केले. 'कुटूंबकर्ती' म्हणूनही सरलाबाई इतरांच्या मनपटलावर प्रेरणेची माळच फुलवतात.सरलाबाई यांचे पती हे चाळीसगाव पोस्ट कार्यालयात नोकरीस होते. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले. भरल्या संसारात असा अंधार दाटल्यानंतर अल्पशिक्षित सरलाबाई काही काळ कोलमडल्या. तथापि पाच मुलींचे गोंडस चेहरे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरीची संधी मिळाली. २००८ मध्ये मोठ्या जिद्दीने त्या पोस्ट सेवेत रुजू झाल्या. गेल्या १४ वर्षात खचून न जाता संसाराचा गाडा ओढला. संघर्षाच्या १४ वर्षात त्यांनी पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे हातही पिवळे करुन दिले. पाचही मुली त्यांच्या सुखी संसारात रमून गेल्या आहेत.सरलाबाईंनी बेलगंगा पोस्ट कार्यालयात सेवेला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षापासून त्या चाळीसगाव कापड गिरणी पोस्ट कार्यालयात मेल वितरक म्हणून काम करीत आहे. बसस्थानकात टपाल पिशव्यांची बसमध्ये पोहच करण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली आहे. सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत त्यांची बसस्थानकात धावधाव सुरू असते. कठीण परिस्थितीत दुःखाला कवटाळत न बसता सरलाबाई संकटांना भिडल्या. आर्थिक संकटेही त्यांनी पेलली. मात्र आयुष्यावर 'शतदा प्रेम' करावे, असं म्हणत त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मध्यंतरी आजारानेदेखील या दुर्गेची परीक्षा घेतली. यातही सरलाबाईंनी नेटाने आजाराला परतवून लावले. कर्म ही पूजा केली की, परमेश्वर मदतीसाठी धावून येतोच, असं मोठ्या आत्मविश्वासाने त्या सांगून जातात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव उजळून निघतात.

टॅग्स :Navratriनवरात्रीChalisgaonचाळीसगाव