कोरोना लाटेत काही फायद्यातही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:49+5:302021-06-22T04:11:49+5:30
त्यातही खास करून दहावी व बारावीचे विद्यार्थी. दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांसाठी जणू दिव्यच असते. ...

कोरोना लाटेत काही फायद्यातही...
त्यातही खास करून दहावी व बारावीचे विद्यार्थी. दहावी व बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनेकांसाठी जणू दिव्यच असते. मात्र, कोरोना लाटेमुळे लाखो विद्यार्थ्यांनी जणू हे दिव्य लीलया व विनासायास पार पाडले आहे. ज्यांना उत्तीर्ण होण्याची शक्यता नव्हती अशांसाठी कोरोना लाट भलतीच फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे अशांनी ' कोरोना लाट की जय हो...! ' असे म्हटल्यास त्यांना काय दोष देणार ? यानिमित्ताने १९८२ च्या सुमारास बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असतानाच्या ‘भोसले लाट’ची आवर्जून आठवण येते. तेंव्हा प्राध्यापकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तेव्हा महसूल व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांवर बारावीच्या परीक्षेची जबाबदारी देण्यात आली होती (सुपरवायझर म्हणूनची). त्या काळात प्रचंड कॉप्या चालल्या होत्या. परिणामी हमखास नापास होणारे उत्तीर्ण झाले होते. त्या १९८२ च्या बॅचला ‘भोसले लाट’ हे नाव पडले होते. भविष्यात २०२१-२२च्या दहावी व बारावीच्या बॅचला ' कोरोना बॅच' किंवा 'कोरोना लाट' म्हणून संबोधिले गेल्यास त्याचे कुणास फारसे आश्चर्य वाटू नये. अनेकांवर आपत्ती ठरणारी एखादी लाट काहींसाठी इष्टापत्तीही ठरते हे मात्र नक्की...!!!