शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

झाड छाटण्याचे आदेश असतानाही मूळासकट तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:03 PM

अमळनेरच्या विश्रामगृहातील प्रकार : कारवाईची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : जिल्हा परिषदेच्या येथील विश्रामगृहाच्या आवारातील निंबाचे झाड छाटण्याचे आदेश असताना ते झाड मूळापासून तोडण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांनी याबाबत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता गणेश गवळी यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.शासन आदेश असताना १ जुलैपासून आतापर्यंत येथे विश्रामगृहाच्या मोठ्या आवारात एकही वृक्ष लावण्यात आलेला नाहीत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी अभियंता गवळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विनोद जाधव यांनी केली आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात धुळे रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. विश्रामगृहाच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. त्यापैकीच एक निंबाचे झाड होते. या झाडा शेजारून विद्युत तार गेल्याने पंचायत समितीने पालिकेला पत्र देऊन हे झाड छाटण्याची परवानगी मागितली होती. पालिकेने ती परवानगी १८ मे रोजी दिली होती, मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर १८ जुलै रोजी झाड छाटण्याऐवजी मूळापासून तोडण्यात आले. याबाबत पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांनी अभियंता गवळी यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे जाधव यांनी सांगितले.१ ते १३ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण करण्याचे शासन आदेश होते. असे आदेश असताना विश्रामगृहाच्या आवारात एकही वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. मात्र जे निंबाचे झाड होते तेदेखील तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत अभियंता गवळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदर झाड तोडण्याची पारोळा वनविभागाकडे परवानगी मागितली आहे, मात्र ती अद्याप मिळालेली नाही, ती मिळाली की मूल्यांकन करून त्या झाडाचा लिलाव केला जाईल, असे सांगितले. पारोळा वनविभागाशी संपर्क केला असता वनाधिकारी दशहरे यांनी सांगितले की, सदर झाड पालिका क्षेत्रात येते. त्यामुळे ते तोडण्याची अथवा छाटण्याची परवानगी पालिकेचे वृक्ष अधिकारी देतात.विश्रामगृहात वृक्षारोपण न करता वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत कनिष्ठ अभियंता गवळी यांना विचारणा केली, मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देतात. विनापरवानगी झाड तोडल्याने संबंधितावर कारवाई कराव.-विनोद जाधव, सदस्य, पंचायत समिती, अमळनेर

टॅग्स :forestजंगलAmalnerअमळनेर