पारोळा येथे शिवसेना मदत कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:39+5:302021-09-06T04:21:39+5:30
पारोळा : पारोळा तालुक्यासह एरंडोल, अमळनेर व भडगाव या तालुक्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात येत ...

पारोळा येथे शिवसेना मदत कक्षाची स्थापना
पारोळा : पारोळा तालुक्यासह एरंडोल, अमळनेर व भडगाव या तालुक्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी पारोळा येथील कान्हूबाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात शिवसेना मदत कक्षाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पारोळा येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या प्रयत्नातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक स्वरूप काकडे, राजा भिलारे, डॉ. दिनकर पाटील, चतुर पाटील, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर. बी. पाटील, वासुदेव पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, माजी जि. प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, देवगाव सरपंच समीर पाटील, अनिल महाजन, अरुण पाटील उपस्थित होते.
पारोळा कुटीर रुग्णातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. योगेश साळुंके व वैद्यकीय कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले. आभार प्रवीण बिरारी यांनी मानले.
फोटो ओळी : पारोळा येथे आरोग्य मदत केंद्राचे उद्घाटन करताना अमोल पाटील, मंगेश चिवटे, अशोक मराठे आदी.