जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा सहेली ग्रुपची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:10+5:302021-09-06T04:20:10+5:30

भुसावळ : शहरात जायंट्स ग्रुप ऑफ भुसावळ वसुंधरा सहेली ग्रुपची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी विजयकुमार चौधरी, तर प्रमुख ...

Establishment of Giants Group of Vasundhara Saheli Group | जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा सहेली ग्रुपची स्थापना

जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा सहेली ग्रुपची स्थापना

भुसावळ : शहरात जायंट्स ग्रुप ऑफ भुसावळ वसुंधरा सहेली ग्रुपची स्थापना करण्यात आली.

अध्यक्षस्थानी विजयकुमार चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष मिश्रा, किशोर मिश्रा, रजनी सावकारे, संगीता पाटील, प्रा.डॉ. एच.एम. पाटील, प्रा. शुभांगी राठी, प्रा. टी.बी. पाटील उपस्थित होते.

यावेळी वसुंधरा जायंट्स ग्रुप अध्यक्षा महानंदा पाटील, उपाध्यक्ष राजश्री बादशहा, उपाध्यक्षा वर्षा लोखंडे, सचिव रूपाली पाटणकर, कोषाध्यक्ष मंदाकिनी केदारे, संचालक भाग्यश्री भंगाळे, अलका सपकाळे, मीना राजपूत, रेखा सोनवणे, अंजली वाघमारे, अनिता ठाकरे, नीलिमा पाटील, सोनाली गुरचल, दीपाली आहिरे, कविता महाले, दीपिका मेश्राम, ज्योती पवार, तिलोत्तमा जावळे यांची नियुक्ती करण्यात आली.

विशेष पुरस्कार

याप्रसंगी समाजसेवेत तत्पर असणारे राजश्री नेवे, आरती चौधरी, नाना पाटील, अर्जुन खरारे, डॉ. केतन महाजन, डॉ. आशिष राठी, उज्ज्वला चौधरी, मनीषा पाटील, श्याम गोविंदा, कांतिलाल शर्मा यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

योगशिक्षक पुरस्कार

सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे योगशिक्षक सूर्यवंशी व झांबरे, जयश्री पाटील, पूनम भंगाळे, चारुलता पाटील, रजनी लेखवाणी, सीमा पाटील, संजय धर्मा चौधरी, माधुरी गुजर, दिव्या तेजवानी, महानंदा पाटील, राजश्री बादशहा, वर्षा लोखंडे, रूपाली पाटणकर, अंजली वाघमारे यांना देण्यात आले.

संतोष मिश्रा, संगीता पाटील यांनी वसुंधरा ग्रुपचा शपथविधी घेतला. तसेच विजयकुमार चौधरी, किशोर मिश्रा यांनी फलकाचे अनावरण केले.

मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राजश्री बादशहा यांनी केले व आभार अलका सपकाळे यांनी केले. सर्व वसुंधरा जायंट्स ग्रुपच्या सहेलीने आम्ही समाजासाठी, समाजसेवेसाठी नेहमी तत्पर राहू, असे वचन दिले.

Web Title: Establishment of Giants Group of Vasundhara Saheli Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.