यावल तहसीलला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:12+5:302021-07-01T04:13:12+5:30
यावल : तहसील कार्यालयात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा कक्ष २४ तास ...

यावल तहसीलला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन
यावल : तहसील कार्यालयात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हा कक्ष २४ तास कार्यरत असेल. या नियंत्रण कक्षात विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी वर्गाचा समावेश आहे.
येथील तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारतीत नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. अ वर्गवारीत ३१ तर ब वर्गवारीत १२ अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती व येणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पत्रानुसार फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसीलदार महेश पवार तसेच निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, एस. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.
महसूल सहाय्यक म्हणून तहसील कार्यालय यावलमधील राखीव कर्मचारी म्हणून डी. एस. बाविस्कर, ए. डी. बनकर, एस. डी. जाधव, डी. पी. भुत्तेकर, एच. एम. कांबळे, एल. आर. तडवी, एस. डी. पाटील यांचा समितीत समावेश आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवार शासकीय सुटीच्या दिवशी नियंत्रण कक्षासाठी हजर राहण्यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एम. बी. पाटील, आर. डी. अहिरे, (पंचायत समिती ), ए. यू. कदम व टी. आर. हिवाळे, एस. डी. मावळे, (भूमी अभिलेख कार्यालय), दस्तगीर जोहरबक्ष तडवी, जी. एम. चौधरी (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, यावल), आर. एस. वाघ व आर. एस. बाविस्कर, एम. ए. बजाज (परिचर पंचायत समिती, यावल), जी. एस. जावळे (वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणीपुरवठा, यावल), एस. जे. सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल व एम. एच. हिरवळकर, जी. आर. कोळी व बी. एस. सोनवणे, एम. एफ. तडवी, डी. पी. अडकमोल, व्ही. बी. जंजाळे, ए. बी. चव्हाण, आर. डी. राऊत, एस. बी. तायडे, जी. एम. चौधरी, के. बी. राठोड, एम. एस. येवले, के. एच. तडवी, एम. टी. कोल्हे, एस. एम. कोळी, ए. एन. तहासे, आर. आय. तडवी, एस. डी. कुमावत, ए. बी. तडवी, ए. एच. पिंजारी, पी. एन. दुसाने, बी. व्ही. मेढे, आर. एल. महाजन, एच. व्ही. सनंसे, एस. आर. वराडे, एम. आय. तडवी, एस. एस. तडवी, जी. डी. देवराज, डी. के. नेहते, एस. एस. सोनवणे, एफ. आर. भादले, वाय. ई. जंजाळकर, ए. एम. तडवी, एम. बी. चौधरी, आय. आर. तडवी, के. एस. भंगाळे, वाय. वाय. खान, पी. डी. ठाकरे, एस. एम. कोळी, जे. व्ही. टापरे, बी. के पाटील, के. पी. तायडे, ए. बी. पाटील, सलीम शेख, अस्लम शेख, बी. एन. इंगळे, आर. डी. कोळी, यू. एम. हनवते, आय. आर. तडवी, आर. पी. पाटील, वाय. वाय. खान, पी. डी. ढोके, आर. डी. कोळी यांच्या तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नेमणुका करण्यात आल्या आहेत.