पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धरणगाव जागृत जनमंचची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:14+5:302021-07-29T04:16:14+5:30
संपूर्ण जिल्ह्यात व धरणगाव तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती जनमंचचे सुरुवातीपासून कार्य आहे. धरणगाव शहरात विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत; ...

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धरणगाव जागृत जनमंचची स्थापना
संपूर्ण जिल्ह्यात व धरणगाव तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती जनमंचचे सुरुवातीपासून कार्य आहे. धरणगाव शहरात विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत; परंतु नागरिकांची मुख्य समस्या असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही ठोस कामे गेल्या ५० वर्षांपासून झालेली नाहीत. आज भर पावसाळ्यातदेखील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या शहरात आहे. याची सामाजिक जाणीव ठेवत संपूर्ण पाठपुरावा, आंदोलन, संघटन, पत्रव्यवहार आदी करून धरणगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धरणगाव जागृत जनमंचची स्थापना करण्यात येणार असल्याचे शिवराम पाटील यांनी सांगितले.
धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना धरणगाव जागृत जनमंचसोबत येण्यासाठी शिवराम पाटील यांनी आवाहन केले आहे. ही संघटना सामाजिक व गैरराजकीय असल्याने कुणीही व कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आमच्याशी संपर्क करू शकतात, असे ते म्हणाले.
280721\img-20210728-wa0010.jpg
धरणगाव पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच धरणगाव जागृत जनमंच ची स्थापना : शिवराम पाटील यांची माहिती