वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:13+5:302021-06-25T04:14:13+5:30
जळगाव : राज्यात वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांसाठी शासनाच्या वतीने कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, अशी मागणी जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाच्या ...

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा
जळगाव : राज्यात वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांसाठी शासनाच्या वतीने कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, अशी मागणी जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली. नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर असताना मंडळाकडून त्यांना हे निवेदन देण्यात आले.
कल्याणकारी मंडळासाठी महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटना शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. यासाठी अभ्यास समितीही नेमण्यात आली आहे. हे मंडळ स्थापन झाल्यास विक्रेत्यांना विमा, औषधी, शैक्षणिक मदत यांसारख्या जीवनावश्यक बाबी लागू होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन नाना पटोले यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या वेळी शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी, नितीन चौधरी, रवींद्र जोशी, गोपाल चौधरी, प्रमोद चौधरी, श्रीपाद वाणी, कैलास चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.