अमळनेरात ‘माझे वडील’ विषयावर निबंध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 03:42 PM2020-03-02T15:42:30+5:302020-03-02T15:43:37+5:30

राष्ट्र सेवा दलाच्या संस्कार केंद्रातर्फे आयोजित ‘माझे वडील’ या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.

Essay Contest on 'My Dad' in Amalner | अमळनेरात ‘माझे वडील’ विषयावर निबंध स्पर्धा

अमळनेरात ‘माझे वडील’ विषयावर निबंध स्पर्धा

Next
ठळक मुद्देविजेत्यांना बक्षिसांचे वितरणराष्ट्रसेवादलाचा उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : येथील राष्ट्र सेवा दलाच्या संस्कार केंद्रातर्फे आयोजित ‘माझे वडील’ या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.
निबंध स्पर्धेत यश रतीलाल महाले, ओम विनोद राऊळ, गौरव किशोर पवार यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. लोकेश गोकुळ पाटील व मिसबाह खाटिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
२९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्कार केंद्रात झाले. प्रा. फअशोक पवार, धनंजय सोनार, डॉ.मिलिंद वैद्य, शरद पाटील, दीपक पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते उत्तम तावडे यांनी परीक्षण केले.
या कार्यक्रमास विनोद राऊळ, डॉ.भरत बागुल, दीपक पवार, दीपक चव्हाण, सर्जेररावपाटील हे पालक उपस्थित होते.
उत्तम तावडे यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आला.
तेजस चौधरी, आदित्य चौधरी, अक्षरा सोनार, कृष्णा महाजन, अल्फाईज खाटीक, नैतिक चौधरी या बालसैनिकांनी केलेले उत्कृष्ट संयोजन सर्वांची दाद घेऊन गेले.
दरम्यान, 'माझा अभ्यास माझे भविष्य' हा पुढील स्पर्धेचा विषय देण्यात आला आहे.

Web Title: Essay Contest on 'My Dad' in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.