शालार्थ आयडीचे त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST2021-09-07T04:19:58+5:302021-09-07T04:19:58+5:30

चुंचाळे, ता.यावल : जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी प्रदीर्घ असा संघर्ष केल्यानंतर राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांना २० टक्के वेतन सुरू ...

Error of school ID | शालार्थ आयडीचे त्रुटी

शालार्थ आयडीचे त्रुटी

चुंचाळे, ता.यावल : जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी प्रदीर्घ असा संघर्ष केल्यानंतर राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांना २० टक्के वेतन सुरू झाले व या शिक्षकांचे पुढील नियमित वेतन व्हावे याकरिता शालार्थ आयडी देणे आवश्यक बाब आहे म्हणून शिक्षण संचालक पुणे, शिक्षण आयुक्त पुणे, यांच्या वतीने २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे शालार्थ आयडी देण्यासंदर्भात राज्यभर संदर्भीय प्रस्ताव तपासून हे प्रस्ताव योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहिती आमदार सुधीर तांबे यांनी दिली.

दरम्यान, नेहमीच कार्यालयीन कामकाजामध्ये अग्रेसर असलेला जळगाव हा जिल्हा लातूर नंतर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यावर शालार्थ प्रस्ताव कामकाजात होता. जिल्ह्यातील शिक्षकांना अपेक्षा होती की, आपल्याला लवकरच शालार्थ आयडी मिळणार मात्र ही अशा शिक्षकांची फोल ठरली होती. त्यामुळे संघटनेने आमदार सुधीर तांबे व राज्यातील शिक्षक-पदवीधर आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून शालार्थ आयडीला उशीर होत असल्यामुळे मार्च,एप्रिल,मे, जून या चार महिन्यांचे ऑफलाईन वेतनाची मागणी शासनाकडे केली व विनाअनुदानित शिक्षकांची चूल पेटत ठेवली.

दुसरीकडे शालार्थ आयडी प्रस्तावांची तपासणी करत असताना बहुतांशी शाळांच्या छोट्या-मोठ्या त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्या लगेच निकाली निघू शकतात आणि त्या पद्धतीने सुधीर तांबे, उपसंचालक नितीन उपासनी हे देखील सहकार्य करीत आहे.

त्याचाच भाग म्हणून धुळे, नंदुरबार व नाशिक तीन जिल्ह्यांचे शालार्थ त्रुटी पूर्तता प्रस्ताव सादर करण्याकरता उपसंचालक नितीन उपासनी यांनी शिबिराचे आयोजन करून आपल्या अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय दिला.

मात्र तारीख २४/८ रोजी जळगाव जिल्ह्याचे त्रुटी पूर्तता शिबिर घेतले जाणार होते,परंतु उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडून आलेल्या व्हाॅट्सअप संदेशामध्ये अनुसूचित जाती जमाती संदर्भात शासनस्तरावरून एक(समिती)कमिटी आलेली आहे.

त्याच्यामुळे जिल्ह्यातील त्रुटी पूर्तता कामकाज पुढे कळविले जाईल असे कळविण्यात आले. परंतु दोन आठवड्याचा कालावधी लोटला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील संस्था चालक, मुख्याध्यापक व या त्रुटीतील शिक्षक चिंतेमध्ये होते, सातत्याने संघटनेकडे विचारणा होत होती. म्हणून संघटनेच्या वतीने आमदार सुधीर तांबे यांची भेट भुसावळ या ठिकाणी घेण्यात आली व आपल्या शिक्षकांच्या त्रुटी पूर्तता (शिबिर) कॅम्पचे आयोजन जिल्ह्यामध्येच लवकरात लवकर करण्यात यावे याबाबत विनंती केली.

आमदार तांबे यांनी तत्काळ नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याशी फोनवर बोलून २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांच्या त्रुटी पूर्तता कॅम्पचे आयोजन लवकरच करू असे सांगितले आहे. तर, नाशिक उपसंचालक यांनी येणाऱ्या बुधवारपासून त्रुटी पूर्ततेचे प्रस्ताव जळगाव येथेच स्वीकारले जातील असा शब्द दिला आहे.

पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कृती विनाअनुदानित संघटना राज्य सचिव अनिल परदेशी तसेच संघटनेचे विजय ठोसर, निवृत्ती पाटील, सुधीर शिरसाट, पराग महाजन, संदीप राजपूत व काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश राणे उपस्थित होते.

Web Title: Error of school ID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.