शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

एरंडोलच्या माहेरवाशीणचा पाच लाखांसाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:37 IST

चैनीच्या वस्तू व दागिने विकत घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशीण जयश्री प्रतीक पाटील हिचा सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

ठळक मुद्देसंशयित आरोपींमध्ये पतीसह पाच जणांचा समावेशएरंडोल पोलिसात गुन्हा दाखलपीडित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले

एरंडोल : चैनीच्या वस्तू व दागिने विकत घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशीण जयश्री प्रतीक पाटील हिचा सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयश्री व प्रतीक यांचा विवाह १३ जुलै रोजी थाटात पार पडला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर ‘तू काळी आहे. मला मुंबईकडे १ लाख रुपये कमविणारी पत्नी पाहिजे होती असे म्हणून तिचा इंजिनियर पती प्रतीकसह सासरच्या इतर लोकांनी छळ सुरू केला. तसेच माहेरून ५ लाख रुपये आणावेत यासाठी त्यांनी तगादा लावला. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे जयश्रीचा शारीरिक व मानसिक छळ वाढला. या दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावरील १३० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले. या साऱ्यात छळ असह्य झाल्याने महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिली.त्यानुसार संशयित आरोपी पती प्रतीक जयवंत पाटील, रा नावापाडा ठाणे, मनाली जयवंतराव पाटील (सासू), जयवंतराव बारीकराव पाटील (सासरा), स्मिता किरण पाटील (नणंद), किरण यशवंत पाटील (नंदोई) दोघे रा. डोबीवली यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४९८,५०४, ५०६, ३४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तपास हवालदार नारायण पाटील, प्रमोद कोळी करीत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगErandolएरंडोल