एरंडोल : भडगावहून एरंडोलकडे येणारी शटल सेवेची बस खडके बस थांब्यावर न थांबल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी चालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे संतापलेल्या एरंडोल आगारातील कर्मचाऱ्यांनी सदर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत कामकाज बंद केले होते. अखेर तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर बस सेवा पुर्ववत करण्यात आली.भडगाव ते एरंडोल शटल एम.एच.२० बी.सी.२३९९ ही ५ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास खडके गावाजवळ आली.या थांब्यावर ही बस न थांबल्याने मंगलसिंग नंदलाल पाटील (रा. खडकेसिम) व इतर दोन जणांकडून बस चालक शे.अतिक शे.अनिस (रा.चाळीसगाव, हल्ली मु.एरंडोल) यास मारहाण करून कपडे फाडले.विद्यार्थ्यांनी चालकाला मारहाण केल्याची घटना एरंडोल आगारात माहिती झाल्यानंतर आगारातील सर्व कर्मचाºयांनी मारहाण करणाºयांवर गुन्हा दाखल करा ,अशी भुमिका घेऊन बस सेवा बंद आंदोलन पुकारले. शेवटी तीन वाजेनंतर एरंडोल पोलीस ठाण्यात मंगलसिंग व इतर दोन अज्ञातांविरूध्द भादंवि कलम ३५३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
एरंडोलच्या बसचालकाला विद्यार्थ्यांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:09 IST
भडगावहून एरंडोलकडे येणारी शटल सेवेची बस खडके बस थांब्यावर न थांबल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी चालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.
एरंडोलच्या बसचालकाला विद्यार्थ्यांकडून मारहाण
ठळक मुद्देएरंडोलची बससेवा पाच तास ठप्पशाळकरी विद्यार्थ्यांनी केली मारहाणतीन विद्यार्थ्यांवर केला गुन्हा दाखल