एरंडोलचा साखर व्यापारी जेरबंद

By Admin | Updated: May 21, 2014 01:26 IST2014-05-21T01:26:41+5:302014-05-21T01:26:41+5:30

एरंडोल येथील मनोज ट्रेडिंग कंपनीचे मालक मनोज मानुधने याला शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी जळगावातून अटक केली

Erandol Sugar Traders Jerkband | एरंडोलचा साखर व्यापारी जेरबंद

एरंडोलचा साखर व्यापारी जेरबंद

 जळगाव : दाणाबाजारातील तीन व्यापार्‍यांना साखर देण्यापोटी २४ लाख दहा हजार रुपयांची रक्कम घेत फसवणूक केल्याप्रकरणी एरंडोल येथील मनोज ट्रेडिंग कंपनीचे मालक मनोज मानुधने याला शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी जळगावातून अटक केली. दाणा बाजारातील राणानी ब्रदर्स, जैन ट्रेडिंग कंपनी व श्रीश्रीमाळ ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांनी एरंडोल येथील साखर विक्री करणारे व्यापारी मनोज गोकूळ मानुधने यांच्याकडून साखर खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी मानुधने यांना २४ लाख १० हजार २० रुपयांचे धनादेश दिले होते. यात राणानी बद्रर्स यांनी पाच धनादेशाच्या माध्यमातून १२ लाखांची रक्कम दिली होती. तर जैन ट्रेडिंग कंपनी व श्रीश्रीमाळ ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांनी चार धनादेशाच्या माध्यमातून उर्वरित रक्कम दिली होती. मानुधने यांनी या रकमेची साखर न देता फसवणूक केली होती.

Web Title: Erandol Sugar Traders Jerkband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.