शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेसह यंत्रणाही सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:14 IST

बाजारात गणराय दाखल : विघ्नहर्त्याच्या आगमाने कोरोनासह मंदीचे संकट होणार दूर

जळगाव : गणेशोत्सवासाठी बाप्पा बाजारात दाखल झाले असून विविध प्रकारच्या मनोवेधक मूर्र्तींनी बाजारपेठ सजली आहे. या सोबतच जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून विविध मंडळांकडूनही तयारी केली जात आहे.यंदा कोरोनाचे संकट असल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी नियमांचे पालन करीत उत्साह कायम राहणार असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे गेल्या सहा महिन्यांपासून असणाऱ्या कोरोनाच्या विघ्नासह बाजारपेठेतील मंदीचेही विघ्न दूर होऊन खरेदी वाढून पुढील काळ चैतन्य घेऊन येणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.घराघरात गणेश मूर्तींची स्थापना केली जाते़ त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी मूर्तीकारांनी यंदा देखील शहरात विविध ठिकाणी दुकाने थाटलेली आहेत़ यामुळे वातावरण पूर्णपणे बाप्पामय होऊन गेले आहे़ सागर पार्क, जी.एस. मैदान, अजिंठा चौफुली, गिरणा टाकी परिसर आदी ठिकाणी ही दुकाने लावण्यात आलेली आहेत़कच्या मालाच्या वाढत्या महागाईमुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्के भाववाढ झालेली असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे़प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी), काथ्या, रंग, मॉडेल्स, साचे व वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे मूर्तीचे भाव वाढलेले आहेत़ शंभर रुपयामागे १५ ते २० रुपये वाढ झालेली असल्याचे मूर्ती विक्रेत्यांचे म्हणणे आहे़तसेच शाडू मातीच्या मूर्र्तींची किंमतदेखील महागाईमुळे वाढलेली आहे़ पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्तींच्या किंमतीतही १५ ते २० टक्के वाढ झालेली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे़शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. विनापरवानगी गणेशाची स्थापना केली तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक व एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असून येत्या दोन दिवसात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा व पोलिसांना सहकार्य करावे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षककोरोनाच्या महामारीचे सर्वांसमारे आव्हान आहे. चांगल्या सामाजिक उपक्रमांची पूजा मांडून कोरोनाच्या पार्श्वभूीवर साजरा होणारा गणेशोत्सव सर्व मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करतील. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल. या संदर्भात विविध मंडळांच्या कार्यर्त्यांनाही आवाहन केले जात आहे.- सचिन नारळे, अध्यक्ष,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ२३२१ मंडळातर्फे गणेशोत्सवमोहरम, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची तयारी झाली असून यंदाच्या गणेशोत्सवात २ हजार ३२१ मंडळातर्फे साजरा केला जाणार आहे. तशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.‘इको फ्रेण्डली’ मूर्तींची नोंदणीपर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी भाविक यंदाही जागृत दिसत आहे. त्यानुसार ‘इको फ्रेण्डली’ गणेशमूर्तींच्या नोंदणीसाठी भाविक पसंती देत आहे. यात शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती दुकानांवर उपलब्ध होत आहेत.अशी आहे नियमावली-सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची उंची ४ फुटापेक्षा अधिक नको-घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नको-पूजा व आरतीसाठी ५ पेक्षा अधिक व्यक्ती नको-पदाधिकाºयांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये-परवानग्यांसाठी एक खिडकी योजना

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव