उद्योजकास हॉटेलबाहेर मारहाण
By Admin | Updated: January 14, 2017 00:40 IST2017-01-14T00:40:18+5:302017-01-14T00:40:18+5:30
एमआयडीसी परिसरातील गुलाल बनविणा:या कंपनीचे मालक राजेश गोविंदराम मुंदडा (वय 36) रा़ एमआयडीसी यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री 11़30 वाजेच्या सुमारास घडली़

उद्योजकास हॉटेलबाहेर मारहाण
जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलात मित्रांसोबत जेवणासाठी गेलेल्या एमआयडीसी परिसरातील गुलाल बनविणा:या कंपनीचे मालक राजेश गोविंदराम मुंदडा (वय 36) रा़ एमआयडीसी यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री 11़30 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
राजेश मुंदडा हे प्लॉट नं जी 101 एमआयडीसी परिसर येथे राहतात़ 12 रोजी रात्री 9़30 वाजता मलकापूर येथील मित्र गोपाळ राठी यांचा फोन आला़ त्यांनी आम्ही जळगावात आलो असून भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील एका हॉटेलात त्यांनी बोलावल़े त्यानुसार मुंदडा हे त्यांच्या चारचारकीने रेल्वे स्टेशवनर पोहचल़े यानंतर त्यांनी मित्रांसोबत हॉटेलात जेवण केल़े मुंदडा व त्यांच्यासोबतच्यांना जेवण दिले व हॉटेल मालकाने आम्हाला जेवण दिले नाही, याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी लाथा-बुक्क्यांनी तसेच दगड, फरशीच्या सहाय्याने मारहाण केली़ मुंदडा यांना त्यांच्या मित्रांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण झाली. मुंदडा यांना हाता-पायाला जखम झाली असून इतर ठिकाणी मुक्काबार लागला आह़े राजेश मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला.