जळगाव : ऑलिम्पिक जागरण समिती व नहाटा महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलिम्पिक जागरण एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष संजय मिसळ, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, व्ही. एस. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एम. वायकोळे उपस्थित होत्या. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ओंकार ओतारी यांनी वेटलिफ्टिंगवर मार्गदर्शन केले. रेल्वे संघाचे प्रशिक्षक शिरीष रोमाडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. आनंद उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. चांद खान यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.