राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:09+5:302021-06-22T04:12:09+5:30
शिक्षकांनी प्रतिभावान विद्यार्थ्यांना देशहितासाठी काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रसिद्धीप्रमुख सुनील आंबेकर ...

राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा उत्साहात
शिक्षकांनी प्रतिभावान विद्यार्थ्यांना देशहितासाठी काम करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रसिद्धीप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात महासंघाचे अध्यक्ष जे.पी. सिंघल म्हणाले की, माध्यमांची विविध परिमाणे जाणून कामगारांमध्ये समंजसपणा निर्माण करण्याची गरज आहे. शिक्षक हे सामाजिक परिवर्तनाचे कार्यकर्ते आहे. प्रत्येकाने माध्यम साधनांचा उत्तम वापर करून संस्थेच्या हितासाठी कार्य केले पाहिजे. सोशल मीडियामध्ये तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर अ.भा. सोशल मीडियाचे सहप्रमुख रोहित कौशल यांनी सोशल मीडियावर दर्जेदार सामग्री तयार करण्यासाठी अनुभवाची आवश्यकता असल्याचे सांगितले. संघटनमंत्री महेंद्रा कपूर म्हणाले की, शिक्षण, संघटना आणि समाज हा आपला केंद्रबिंदू आहे. शिक्षकांनी माध्यम, शिक्षण, संस्था आणि समाजाच्या हितासाठी कार्य केले पाहिजे. यावेळी मीडिया सेलचे सदस्य राजेंद्र कोरे, विश्वजीत माणिक शेट्टी, नंदकुमार हंबर्डे, रसिका परब, सुरेंद्र तिके, जीवन महाजन, रमेश शिंगाडे यांच्यासह २१५ सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मीडिया सेलचे सदस्य दर्शन भारती, बसंत जिंदल यांनी केले.