शिरसोलीत लस घेण्यासाठी तरुण-तरुणींचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:07+5:302021-06-27T04:12:07+5:30

शिरसोली : येथे पहिल्याच दिवशी कोरोनाची कोविशिल्ड लस घेण्यासाठी तरुणांचा उत्साह दिसून आला असून तब्बल ११५ जणांनी ...

Enthusiasm of youngsters to get vaccinated against headaches | शिरसोलीत लस घेण्यासाठी तरुण-तरुणींचा उत्साह

शिरसोलीत लस घेण्यासाठी तरुण-तरुणींचा उत्साह

शिरसोली : येथे पहिल्याच दिवशी कोरोनाची कोविशिल्ड लस घेण्यासाठी तरुणांचा उत्साह दिसून आला असून तब्बल ११५ जणांनी लस घेतल्याचे म्हसावद विभागाचे आरोग्य अधिकारी नीलेश अग्रवाल व डॉ. तेजस्विनी देशमुख यांनी सांगितले.

शिरसोली येथे गेल्या दीड महिन्यांपासून कोविड प्रतिबंधात्मक लस टोचणी मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्यात ४५ वर्षांवरील पुरुष व महिलांना लस देण्यात येत होती. तर १८ ते ४४ वर्षांच्या खालील वय असणाऱ्यांचे लसीकरण बंद होते. परंतु शनिवार, दि. २६ जून रोजी १८ च्या पुढे वय असणाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात होताच पहिल्याच दिवशी तरुण तरुणीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यात पहिल्याच दिवशी तब्बल शंभर तरुण-तरुणींसह ११५ जणांनी शांततेत आपले लसीकरण करून घेतले आहे. आतापर्यंत शिरसोलीत जवळपास १ हजार जणांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्यसेवक अनिल महाजन, नीलेश चौधरी, राजश्री वाघोदे, रमणबाई चौधरी यांनी सांगितले. या वेळी लसीकरण करणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीही करून घेतली. लसीकरण करण्यासाठी गावातील आशा वर्कर यांनी मदत केली.

---------------------

लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर तरुण तरुणींची झालेली गर्दी.

Web Title: Enthusiasm of youngsters to get vaccinated against headaches