सन योगा गृप व रोटरी रॉयल्स ग्रुपतर्फे योग दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:41+5:302021-06-22T04:12:41+5:30

जळगाव : येथील सन योगा ग्रुप व जळगाव रोटरी राॅयलतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोनी फार्म हाऊस येेथे ...

Enthusiasm for Yoga Day by Sun Yoga Group and Rotary Royals Group | सन योगा गृप व रोटरी रॉयल्स ग्रुपतर्फे योग दिन उत्साहात

सन योगा गृप व रोटरी रॉयल्स ग्रुपतर्फे योग दिन उत्साहात

जळगाव : येथील सन योगा ग्रुप व जळगाव रोटरी राॅयलतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोनी फार्म हाऊस येेथे योगासन व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगशिक्षक सुनील गुरव यांनी योगासन व प्राणायामाच्या विविध लाभदायी प्रकारांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकही करून

दाखविले. यानंतर योग शिक्षिका अर्चना गुरव, नेहा तळेले व सुभाष तळले यांनी नागरिकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करुन घेतले. या शिबिरात रॉयल्स ग्रुपचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, मानद सचिव सचिन जेठवाणी, सन योगा गृपचे कन्हैयालाल जाधवाणी,जनसंपर्क प्रमुख विजय लाठी, गोविंद वर्मा, जितेंद्र भोजवाणी, दीपक पाटील, शरद जोशी, गिरीश शिंदे, प्रशांत पारसवाणी, पिंकी मंधाण, सुधा काबरा, प्रीती चोरडिया, ओमप्रकाश सचदेव, गोल मंडोर,पारसमल जैन, कन्हैयालाल जाधवाणी, रवी नाथाणी, अनिल मुंदडा, रमेश मताणी आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Enthusiasm for Yoga Day by Sun Yoga Group and Rotary Royals Group