बामोशीबाबांच्या उरूसचा उत्साह

By Admin | Updated: May 13, 2014 00:13 IST2014-05-13T00:13:20+5:302014-05-13T00:13:20+5:30

हिंदू-मुस्लीम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरमुसा कादरी उर्फ बामोशीबाबांच्या दर्ग्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात उरूस साजरा केला जातो. यंदा हा उरूस १३ मेपासून भरत आहे.

The enthusiasm of Umao of Bamoshibaba | बामोशीबाबांच्या उरूसचा उत्साह

बामोशीबाबांच्या उरूसचा उत्साह

बामोशीबाबांच्या उरूसचा उत्साह

संजय सोनार, चाळीसगाव - हिंदू-मुस्लीम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरमुसा कादरी उर्फ बामोशीबाबांच्या दर्ग्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात उरूस साजरा केला जातो. यंदा हा उरूस १३ मेपासून भरत आहे. बामोशीबाबांचे दर्शन घेण्यासाठी व उरुसात सहभागी होण्यासाठी देशभरातून सुमारे दोन ते अडीच लाख हिंंदू-मुस्लीम बांधव येथे दरवर्षी येतात. यासाठी प्रशासन व ट्रस्टतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोनशे वर्षांपूर्वीचा दर्गा चाळीसगाव शहराच्या पश्चिमेस डोंगरी नदीच्या काठावर चिंंचेच्या झाडाच्या छायेत वेढलेला दर्गा हा पीरमुसा कादरी यांचा आहे. त्याचे नाव बामोशीबाबा कसे पडले याबाबत दंतकथेनुसार, ब्राह्मणबाबा, बामणबाबा, बामोशीबाबा असा अपभ्रंश झाला असावा, असे म्हटले जाते. या दर्ग्याच्या बांधकामावरून हा दर्गा सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी एक लंबाकृती कबर आहे. त्यावर छत उभारले आहे. चारही बाजूस फरशी बसविलेली आहे. प्रवेशद्वार हिंंदू देवळांच्या गोपुराप्रमाणे बांधलेले आहे. पलीकडे मशीद असून बाजूला धर्मशाळा बांधलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदीच्या बाजूने दगडी भिंंत घालून भराव करून तटबंदी केलेली आहे. १५ दिवसांची यात्रा पीर मुसा कादरी उर्फ बामोशीबाबांचा उरूस १३ मेपासून सुरू होत आहे. १५ दिवस यानिमित्त यात्रा भरणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी रात्री १२ वाजता बामोशीबाबांच्या समाधीला (कबर) स्नान (गुसल) घालण्यात येणार आहे. १४ रोजी रथ गल्लीतून सायंकाळी ७ वाजता संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. १५ रोजी सायंकाळी ६ वाजता सदर बाजारातील देशमुख कुटुंबीयांच्या घरापासून तलवार मिरवणूक निघणार आहे. तलवार मिरवणुकीचा मान देशमुख कुटुंबीयांना, तर संदलचा मान मिर्झा कुटुंबीयांना दिला जातो.

Web Title: The enthusiasm of Umao of Bamoshibaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.