आमदार मंगेश चव्हाणांच्या गैरवर्तनाचा उर्जामंत्र्याकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:57+5:302021-03-28T04:15:57+5:30
ट्विटरद्वारे दिली माहिती :दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना ...

आमदार मंगेश चव्हाणांच्या गैरवर्तनाचा उर्जामंत्र्याकडून निषेध
ट्विटरद्वारे दिली माहिती :दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना खुर्चीवर बांधून,त्यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी निषेध केला आहे. तसेच या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना जाब विचारला. तसेच त्यांचा कार्यालयातच शेख यांना खुर्चीवर बांधले होते. या प्रकारानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. दरम्यान, या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असतांना राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या घटने प्रकरणी ट्विटरद्वारे ट्विट करून निषेध नोंदविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात पेट्रोल, डिझेल, व गॅसचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्या विरुद्ध भाजपाचे नेते काहीही बोलत नाही.त्यामुळे या घटनेचा आपण निषेध करित असून, आमदार चव्हाण यांच्यासह इतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.