चाळीसगावी नद्यांमधील अतिक्रमणाने पुसली पूररेषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:52+5:302021-06-04T04:13:52+5:30
तितूर नदी ही पश्चिमेकडून वाहत येऊन शहरात प्रवेश करते. डोंगरी नदीचा उगम पाटणादेवीच्या डोंगर रांगामधून झाला आहे. बामोशी दर्गाह ...

चाळीसगावी नद्यांमधील अतिक्रमणाने पुसली पूररेषा
तितूर नदी ही पश्चिमेकडून वाहत येऊन शहरात प्रवेश करते. डोंगरी नदीचा उगम पाटणादेवीच्या डोंगर रांगामधून झाला आहे. बामोशी दर्गाह परिसरात डोंगरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, यामुळे नदीच्या मुख्य प्रवाहाला बाधा पोहोचते. नदीच्या पात्रातच छोट्या झोपड्या थाटून काहींनी पथारी पसरली आहे.
चौकट
शिवाजी घाट परिसरातील तितूर नदीपात्रालगतही अतिक्रमणाचे शेपूट वाढले आहे. नवा पूल ते स्टेशन रोड हा भाग नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाने जोडला जाणार आहे. यासाठी स्टेशन रोडकडील बाजूने सूर्यनारायण मंदिर परिसराला खेटून मोठ्या प्रमाणात भर करण्यात आली आहे. पुलाचे कामदेखील गेल्या तीन ते चार वर्षांपासून अपूर्ण आहे.
१...नदीपात्रातील पूररेषाच निश्चित नसल्याने दरवर्षी नव्या पुलावरील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
२..नव्याने नदीत उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या प्रवेशाजवळही दुकाने आहेत. त्यामुळे या पुलाचा अजूनही फारसा उपयोग होत नाही.
३...नदीपात्रालगत अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या असून, उर्वरित अतिक्रमणधारकांनाही नोटीस देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.
.......
चौकट
नदी नव्हे गटारगंगा
डोंगरी व तितूर या दोन्ही नद्यांमध्ये शहरातील बहुतांशी नागरी वस्त्यांमधील घाण पाणी सोडण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. हिरापूर रोड परिसरात रसायने मिश्रित घाण पाणी नदीपात्रात येत असल्याने या परिसरात नदीलगत दुर्गंधीची समस्या तीव्र झाली आहे.
* नव्या फरशी पुलावर भाजी मंडईतील भाजीपाला विक्रेते सायंकाळी उरलेला निकृष्ट भाजीपाला नदीपात्रातच टाकतात. यामुळे तितूर नदीपात्रात घाणीचे साम्राज्य झाले असून, काटेरी वनस्पतींही वाढल्या आहेत.