अटल महापणन विकास अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे होणार सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:00 IST2017-10-26T12:29:09+5:302017-10-26T13:00:07+5:30
वेगवेगळ्य़ा व्यवसायासाठी प्रोत्साहीत करणार

अटल महापणन विकास अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे होणार सक्षमीकरण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - सहकार विभागाच्या वतीने राबविण्यात येणा:या अटल महापणन विकास अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात सहकरी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत असून संस्थांना विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
सहकारी संस्थांची स्थिती बिकट होत असल्याने त्यांना ऊर्जा मिळून त्या पुनर्जिवीत होण्यासाठी अनेक उपाय केले जात आहे. यामध्ये अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत असून यात विविध कार्यकारी सहकारी संस्था, देखरेख संघ यासह विविध सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रथम जिल्ह्यातील 10 संस्थांची निवड करण्यात येणार असून त्यानंतर इतर संस्थांना संधी दिली जाणार आहे.
वेगवेगळे व्यवसाय
संस्थेतील गरज ओळखून संधी दिल्या जाणार असून जिल्ह्यात केळी, कापूस, दूध यांच्या व्यवसायाच्या अधिक संधी आहे. त्यामुळे त्या त्या भागात कोणत्या बाबीची गरज आहे, त्यानुसार त्या संस्थांना संधी दिल्या जातील.
या संदर्भात सहायक निबंधकांना सूचना देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर संचालकांच्या बैठका घेण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा उप निबंधक विशाल जाधवर यांनी सांगितले.